रत्नागिरी पर्यटन जिल्हा म्हणून लवकरच मान्यता : मुख्यमंत्री 

रत्नागिरी पर्यटन जिल्हा म्हणून लवकरच मान्यता : मुख्यमंत्री 

रत्नागिरी - ""रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग एवढेच पर्यटन आहे. त्यामुळे कोकणच्या विकासासाठी आज रत्नागिरी जिल्हाही पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करतो. लवकरच याला मान्यता देण्यात येईल,'' अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

रत्नागिरीत जनादेश यात्रेनिमित्त झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात आणि गर्दीत ही सभा झाली.

मुख्यमंत्री म्हणाले,"" रत्नागिरीचा विचार केल्यास 1,639 किमीचे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडकमधून केले. मुंबई गोवा महामार्गाचे 45 किमीचे काम पूर्ण झाले आहे. 95 टक्के जमीन अधिग्रहण झाले आहे. गेल्या तीन महिने पाऊस पडत असल्याने काम थांबले आहे पण पाऊस थांबल्यानंतर हे काम वेगात पूर्ण होईल. हा रस्ता विकासाकडे नेणारा आणि पर्यटन वाढीसाठी लाईफ लाईन ठरेल. रत्नागिरी विमानतळ उडानच्या तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट आहे. एमआयडीसीसोबत करार करून विमान सेवा सुरू करणार आहे.''  

मुख्यमंत्री म्हणाले,जयगड ते  डिंगणी रेल्वेमार्ग, पोर्टमुळे जिल्ह्यात रोजगारांची निर्मीती होत आहे. 63 कोटींची पाणी पुरवठा योजनाही रत्नागिरीसाठी मंजूर केली आहे. "

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com