esakal | राजवाडे यांची मुख्यमंत्र्यांना विनंती : अमरनाथची यात्रा रद्द होते, पंढरपूरची वारी रद्द झाली, मग हे विकतचे दुखणे का...
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Uddhav Thackeray  Appeal to servants to avoid travel request for Rajwade because ganesha festival

चाकरमान्यांना प्रवास टाळण्याचे आवाहन करा ; अधिकाधिक मेल पाठविण्याची गरज 

राजवाडे यांची मुख्यमंत्र्यांना विनंती : अमरनाथची यात्रा रद्द होते, पंढरपूरची वारी रद्द झाली, मग हे विकतचे दुखणे का...

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी :  गणपती सणासाठी कोकणात जाण्यास भक्तगण इच्छुक आहेत. एका बाजूला कोरोनाची भीती आणि सणाला जाण्याची अपार ओढ, यामध्ये चाकरमानी अडकला असला तरी त्याच्या आगमनाने रत्नागिरी, सिंधुदुर्गात होणारी प्रचंड गर्दी अन्‌ कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेवर येणारा वाढीव ताण लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणात आणि इतरत्रही तूर्त लोकांनी मोठ्या संख्येने प्रवास करू नये, असे आवाहन करावे, अशी मागणी चाकरमानी अशोक राजवाडे यांनी केली. अशा आशयाचा मेल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला असून आणखी लोकांनी अशी मागणी करावी, असे आवाहन केले.

हेही वाचा- मत्स्य विभागाकडून आदेश ; मच्छीमारी नौकांवर आता याची आहे नजर.... -


राजवाडे मुंबईत विविध चळवळीत वावरतात. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘गणेशोत्सवासाठी तीन हजार गाड्या सज्ज’ अशी बातमी २२ जुलैच्या वर्तमानपत्रात मी वाचली. मीही चाकरमानी आणि मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे. ती बातमी वाचून पोटात गोळा उठला. कोरोनातून मुंबई शहर बाहेर येतं आहे, असंही धडपणे म्हणता येत नाही आणि पुण्याचा कहर तर सुरूच आहेत. जिल्ह्यांच्या ठिकाणी लॉकडाउन सुरू आहेत. कोरोनाशी झुंज देताना शासनाचे कंबरडे मोडायची वेळ आली, अशावेळी शासनाला हे कशासाठी करायचं आहे? किमान लाख-दीड लाख चाकरमानी येण्याची शक्‍यता आहे. नेहमीच्या हालात कोरोनाचे संकट आहे, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आवाहन करावे, अशी मागणी केली.

हेही वाचा- राज्यमंत्री तटकरे ; रत्नागिरी व गुहागर तालुक्यात शासन राबवणार पायलट प्रोजेक्‍ट  कोणता वाचा.... - 

दापोली, मंडणगडला होणार फायदा...

सविस्तर वाचा...

अमरनाथ, पंढरपूरचे उदाहरण
अमरनाथची यात्रा रद्द होते. पंढरपूरची वारी रद्द झाली. मग हे विकतचे दुखणे शासनाने आपल्या डोक्‍यावर का घ्यावं, विलगीकरणाच्या नियमाचं गणेशचतुर्थीच्या आधीच विसर्जन होण्याचीच शक्‍यता गर्दीमुळे अधिक. कोकणात आणि इतरत्रही तूर्त लोकांनी मोठ्या संख्येने प्रवास करू नये, असे आवाहन केल्यास जनता आणि गावाकडचे नागरिक आपल्याला दुवा देतील, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

संपादन - अर्चना बनगे 

loading image
go to top