मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी स्वाभिमानकडून फलक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

रत्नागिरी - महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने रत्नागिरी दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू असताना शहरामध्ये ठिकठिकाणी स्वाभिमान पक्षाचे स्वागत फलक लागल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. फलकावर खासदार नारायण राणेंसह आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे तिघांचेही फोटो आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात राणेंच्या प्रवाशांविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

गेले महिनाभर भाजपमध्ये राज्यातील मोठे नेते प्रवेश करीत आहेत. कोकणातून राणे कुटुंबीय भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अटकळ बांधली जात होती. तारखांवर तारखा जाहीर होत होत्या. आता मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यामध्ये त्यांचा प्रवेश होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. याबाबत अद्यापही स्वाभिमानकडून अधिकृत जाहीर करण्यात आलेले नाही. प्रवेशाच्या तारखा लांबत असतानाच रत्नागिरी शहरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील मोक्‍याच्या ठिकाणी हे फलक झळकत असल्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का बसला आहे. 

भाजपच्या कोट्यातून नारायण राणेंना राज्यसभेवर संधी मिळाली आहे. त्यांच्याबरोबर उर्वरित दोन मुलांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुुरू आहेत. त्यात नितेश राणे हे कणकवलीमधून विद्यमान आमदार आहेत. तर लोकसभा निवडणुकीत नीलेश राणेंना पराभव पत्करावा लागला होता. सिंधुदुर्गमध्ये भाजपमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विरोधाचा सूर लावण्यात आला होता. वरिष्ठस्तरावर त्याची किती दखल घेतली जाणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. गेले आठ दिवस राणेंच्या प्रवेशाची चर्चा दबली होती.

मुख्यमंत्र्यांच्या निमित्ताने ती पुन्हा उफाळून आली आहे. स्वागत फलकांमुळे त्यात आणखीनच भर पडली आहे. फलक लावताना स्वाभिमान पक्षाचे फलक रत्नागिरी शहरात जेलनाका, माळनाका मारुतीमंदिर, जिल्हा शासकीय रुग्णालय, अशा मोक्‍याच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. भाजपकडून लावण्यात आलेल्या मोठ्या फलकांशेजारीच राणेंचे तोडीस तोड फलक दिसत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister welcome board by Swabhiman party