शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री करणार "पॅचअप'

शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री करणार "पॅचअप'

सिंधुदुर्गनगरी - शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. खासदार विनायक राऊत यांच्या संभाव्य उमेदवारीला भाजपच्या नेत्यांनी थेट विरोध केला आहे. यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पॅचअप करावे लागणार आहे.

युतीची घोषणा होताच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ शिवसेनाला सुटणार हे उघड झाले. शिवसेनेने तशी तयारीही सुरू केली. मात्र भाजपच्या नेत्यांनी प्रमोद जठार यांच्या नावाला पसंती देत राऊत यांच्या विरोधात उघड वक्‍तव्य केली. काही नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला. जठार यांनी नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. 

या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी त्या नेत्यांची मुख्यमंत्री समजूत काढतील असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा विषय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पर्यंत गेला आहे.

जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्यांनी या संदर्भात चर्चेला बोलावल्याचेही समजते. मात्र या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाच हस्तक्षेप करावा लागणार आहे. मुख्यमंत्री 5 तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येण्याची शक्‍यता आहे. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडली जाण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com