नरेंद्र महाराज संस्थानतर्फे १५० मुले दत्तक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

रत्नागिरी - ‘‘संतुलित जीवनशैली प्रगत माणसाच्या भविष्याची गरज आहे. म्हणून स्थैर्यासाठी मनाचे संतुलन जपणे गरजेचे आहे’’, असे प्रतिपादन नाणीज पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांनी मुंबईतील कार्यक्रमात केले. या वेळी जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे स्वयंरोजगार प्रशिक्षणासाठी १५० तरुण-तरुणींना दत्तक घेण्यात आले.

त्याचबरोबर पाच रुग्णालयांना २० व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.
परळ येथील शिरोडकर महाविद्यालयाजवळील नरे पार्क मैदानावर त्यांचे प्रवचन झाले. याप्रसंगी गरीब, गरजू १५० युवक-युवतींना स्वयंरोजगार शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. के.ई.एम, सायन, नायर, तसेच शिवडीच्या टी. बी. हॉस्पिटलला प्रत्येकी पाच व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.

सोहळ्याला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, मुंबईच्या उपमहापौर होंगी वरळीकर, प्रसिद्ध युरॉलॉजिस्ट डॉ. नीलेश रांगणेकर, प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रे अग्रवाल, प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. राहुल साऊजी, डॉ. सुधीर चौधरी, क्षयरोगतज्ज्ञ डॉ. ललित आनंदे, तसेच नगरसेविका सिंधुताई मसूरकर आदी उपस्थित होते.

Web Title: child adopt by narendra maharaj sansthan