चिपीबाबत डीजीसीआईच्या अहवालाने सत्ताधारी तोंडघशी - इब्रामपूरकर

chipi airport issue amit ibrampurkar statement
chipi airport issue amit ibrampurkar statement

मालवण (सिंधुदुर्ग) - गेले महिनाभर सत्तेतील आमदार, खासदार, पालकमंत्री चिपी विमानतळ आमच्यामुळेच सुरू होणार असे सांगत ठेकेदाराकडुन निमंत्रण पत्रिका छापुन घेतल्या. विमान काही दिवसात उडणार असल्याचे भासवले; पण आता हेच लोकप्रतिनीधी डीजीसीआईच्या अहवालानंतर तोंडघशी पडल्याचे स्पष्ट होत आहे, असे मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची अवस्था "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग', असा प्रकार झाल्याचे दिसते, अशी टीकाही त्यांनी केली. 

पत्रकात म्हटले आहे, की मनसे नेते परशुराम उपरकर यांनी दोन दिवसांपुर्वी विमानतळ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हे विमानतळ अजुन महिनाभर तरी सुरू होणार नसल्याचे ठामपणे सांगितले होते. विमानतळाबाबत असलेली सत्य वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली होती. म्हणजेच मनसे जनतेशी खरं आणि प्रामाणिक वागत आहे. तर सत्ताधारी जनतेला फसवत असल्याचे स्पष्ट होते. खासदार विनायक राऊत यांनी निवडणुकीपुर्वी सोनवडे-घोडगे पुल बजेटमध्ये 115 कोटी तरतुद असलेल्या आणि आता अंदाजपत्रक 590 कोटी झालेल्या पुलाचे पुढे काय झाले. जिल्ह्यातील अनेक विकासकामांबाबत खोटे बोला पण रेटून बोला ही सत्ताधाऱ्यांची वृत्ती जनतेनेही लक्षात घ्यावी. 

एकीकडे सत्तेतील लोकप्रतिनिधी विमान उतरविण्याचे श्रेय घेत असतानाच मनसे नेते उपरकर यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या पाहणी दौऱ्यात विमानासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा वीज, पाणी, रस्ते अजूनही झालेले नाहीत. हे जनतेसमोर स्पष्ट केले होते आणि म्हणूनच उपरकरांच्या दौऱ्यानंतर पालकमंत्री, आमदार, खासदार यांना काल एकत्रित येऊन पाणी, वीज, रस्ते या पायाभूत सुविधांची उशिराने दखल घ्यावी लागली.

वीज, पाणी, रस्ता या मूलभूत सुविधा होण्यासाठी शासनाच्या बजेटमध्ये तरतूद होणे आवश्‍यक होते; परंतु सत्ताधारी लोकप्रतिनिधी अकार्यक्षम असल्यामुळेच तसे होऊ शकले नाही. जिल्ह्यात असलेले सत्ताधारी निधी आणू शकत नाहीत. राष्ट्रवादीचे अजित पवार अर्थमंत्री आहेत ते शिवसेनेच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निधी देत नाहीत ही शोकांतिका आहे. त्यामुळेच हे लोकप्रतिनिधी वारंवार विमानतळावर पाहणी दौरा करण्याची नौटंकी करत जिल्ह्यातील जनतेला फसवत आहेत आणि विमानतळ उद्‌घाटनाच्या तारखा जाहीर करत आहेत, असेही इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे. 

का होणार उशीर ? 
दिल्लीवरून नागरी विमान महानिदेशालय (डी.जी.सी.ए.) पथक दाखल झाले होते. त्यांनी काही त्रुटी काढल्या आहेत. या त्रुटी पूर्ण करण्यासाठी किमान महिन्याभराची तरी मुदत लागणार आहे. या त्रुटीची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा एकदा ते पथक पाहणी करेल. त्यानंतर विमानतळ सुरू करण्याबाबत परवाना दिला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांचा हवाला घेवून माजी आमदार परशुराम उपरकर यांनी याआधी दिली होती. 
 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com