चिपळूण पालिकेत ग्रॅव्हिटी योजनेच्या पाण्यावर वीजनिर्मिती 

चिपळूण पालिकेत ग्रॅव्हिटी योजनेच्या पाण्यावर वीजनिर्मिती 

चिपळूण - ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा विचार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने केला आहे. जीवन प्राधिकरण विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा पलांदे यांनी चिपळूण दौऱ्यात याबाबतचे संकेत दिले. जलशुद्धीकरण प्रकल्पाचा खर्च वाचविण्यासाठी या पर्यायाचा विचार सुरू आहे. 

चिपळूण शहराला कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी आणण्यासाठी चिपळूण पालिकेने योजना तयार केली. काही दिवसांपूर्वी खासगी एजन्सीमार्फत या योजनेचा सर्व्हे केला. सुमारे 70 कोटींच्या योजनेचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठण्यात आला.

योजनेची शक्‍यता पडताळण्यासाठी जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता सौ. पलांदे गेल्या आठवड्यात चिपळूणला आल्या होत्या. त्यांनी कोळकेवाडी धरण ते चिपळूण शहरापर्यंत पाहणी केली. त्यावेळी कोळकेवाडी धरणाच्या पायथ्याशी विद्युत गृह उभारण्याची कल्पना त्यांनी मांडली.

सध्या पालिका वाशिष्ठीतील पाणी उचलून शुद्धीकरण प्रक्रिया करते. यानंतर ते पाणी पिण्यासाठी दिले जाते. ग्रॅव्हिटी योजनेत कोळकेवाडी धरणातून थेट पाईपलाईने चिपळूण शहराला पाणीपुरवठा करताना पालिकेला जलशुद्धीकरण प्रकल्प उभारावा लागणार आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प न उभारताना धरणाच्या पायथ्याशी वीज निर्मिती करणारे संच बसविले, तर शासनाला वीज मिळेल आणि पाणीही शुद्ध होईल. ते पाणी शहराला पुरवता येईल. 

पायथा विद्युतगृहचा प्रस्ताव 
जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेला खर्च करावा लागेलच. त्याशिवाय तो चालविण्यासाठी पालिकेला दरवर्षी निधीची तरतूद करावी लागेल. मात्र 40 मेगावॉट वीज निर्मिती करणारे संच बसवण्यासाठी शासनाने एकदाच खर्च करावा लागेल. या शिवाय वीजनिर्मितीतून उत्पन्नही मिळेल. यासाठी पायथा विद्युतगृहाची उभारणी करण्याचा प्रस्ताव आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील सिंचनासाठी कोयना धरणातून 22 टीएमसी पाणी सोडले जाते. सिंचनासाठी सोडण्यापूर्वी पायथा विद्युतगृहात वीजनिर्मिती केली जाते. याच पद्धतीने कोळकेवाडी धरणाच्या ठिकाणी पायथा विद्युतगृह उभारून वीजनिर्मिती करायची नंतर ते पाणी चिपळूणला सोडण्याचा विचार सुरू आहे. 

- सुरेखा खेराडे, नगराध्यक्ष, चिपळूण 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com