bhat sheti
bhat sheti sakal

चिपळूण : प्रतीक्षा खताची; कशी करायची शेती ?

६०० टनाची मागणी; जिल्हाधिकारी लक्ष देतील का?

चिपळूण : तालुक्यात पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्‍यांवर येते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यातच युरिया या खताचा तुटवडा आला आहे. अजूनही ६०० टन खताची मागणी असून, अनेक दिवसांत खताचा पुरवठा न केल्याने येथील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांसह कृषी विभागाने शेतकऱ्‍यांना न्याय देण्याची मागणी केली जात आहे.

सध्या तालुक्यातील विविध भागांत भातरोपांची लागवड झाली असली तरी त्याची वाढ खतांअभावी पुरेशी झालेली नाही. त्यामुळे शेतकरीवर्गातून खतांबाबतची ओरड सुरू झाली आहे. सुरवातीच्या टप्प्यात युरिया उपलब्ध झाला असला तरी ठराविक सोसायट्यांनाच ते पुरवण्यात आले. बहुतांशी सोसायट्या खतांपासून वंचित राहिल्याने त्याचा थेट परिणाम शेतीवर होऊ लागला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने व खत उपलब्ध होत नसल्याने दुबार पेरणीचे संकट काहींवर ओढवले आहे. त्यासाठी शेतकरी सोसायटी स्तरावर खत मिळवण्यासाठी हेलपाटे मारत आहेत; परंतु कंपन्याकडूनच योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही. गेल्या आठवडाभरात एकदाही खताची गाडी आलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी खताच्या प्रतीक्षेत आहेत.

चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघातर्फे तालुक्यातील ४१ विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे वितरण केले जाते. तालुक्यात भातबियाण्यांची ११०० क्विंटल मागणी आहे. त्यापैकी ९५० क्विंटल भातबियाणे प्राप्त झाले आहे. त्यातील ७०० क्विंटल विविध कार्यकारी सोसायट्यांना वाटप झाले. शेतकऱ्यांना ही बियाणे व खते त्यांच्या शेताच्या बांधावर उपलब्ध व्हावीत, कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी संघातर्फे विशेष प्रयत्न केले जात होते; परंतु खताचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने ही यंत्रणादेखील आता अडचणीत आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चिपळूण तालुक्यात खतच उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी सगळीकडून संकटात आला आहे. शेतकरी कृषी विभागाच्या अनास्थेचा बळी ठरत आहे.

पावसाळ्याच्या सुरवातीलाच तालुक्यातील शेतकऱ्यांना खताचा मुबलक पुरवठा व्हावा, यासाठी आम्ही संबंधित कंपन्याकडे वेळीच खतांची मागणी केली होती; मात्र खतांच्या कंपन्यांकडून योग्य पद्धतीने नियोजन न झाल्याने हा गोंधळ निर्माण झाला. शेतकरी दररोज मोठ्या संख्येने सोसायटीकडे खताची मागणी करू लागलेत; मात्र खत उपलब्ध नसल्याने त्यांना माघारी परतावे लागते. अजूनही तालुक्यात ६०० टन खताची गरज आहे.

- पांडुरंग कांबळे, व्यवस्थापक, चिपळूण तालुका खरेदी-विक्री संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com