esakal | चिपळूण: महापुराच्या प्रलयानंतरही श्रींची जल्लोषात प्रतिष्ठापना
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण: महापुराच्या प्रलयानंतरही श्रींची जल्लोषात प्रतिष्ठापना

चिपळूण: महापुराच्या प्रलयानंतरही श्रींची जल्लोषात प्रतिष्ठापना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण: पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा अशा गाण्यांचा ठेका, गणपती बाप्पा मोरया, चा जयघोष करीत चिपळूणकरांनी लाडक्या गणरायाला घरी आणले. विशेष म्हणजे महापुराच्या महाप्रलयानंतर सावरलेल्या शहरवासियांमध्ये गणपती बाप्पाला घरी आणताना दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही तोच उत्साह आणि जल्लोष दिसून आला.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचे उद्या उद्घाटन

काहींनी डोक्यावरून, एसटीने, दुचाकी, रिक्षाने, तर अनेकांनी खासगी वाहनातून गणेशमूर्ती घरी नेल्या. यामध्ये लहान मुलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यातून हजारो चाकरमानी तालुक्यात दाखल झाले. खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत तोबा गर्दी केल्याने शहरातील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. शुक्रवारी (ता. १०) विधीवत पूजा करून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

त्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. चाकरमानीही मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले असून अजूनही त्यांचे आगमन सुरूच आहे. यावर्षी तब्बल एक हजार एसटी बसेस कोकणात दाखल झाल्याची माहिती चिपळूणचे आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी दिली. घरोघरी सजावट, रोषणाई आणि बाप्पासाठी नवैद्य अशी सर्व तयारी करण्यात आली. चाकरमान्यांची प्रवासादरम्यानची सर्व काळजी प्रशासनाने घेतली असून चेकपोस्टवर माहिती घेऊन पुढे पाठवले जात आहे.

गणेशमूर्तीची प्रतिष्ठापनेवर एक दृष्टीक्षेप..

चिपळूण पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ सार्वजनिक, १६, ४६४ घरगुती

सावर्डे हद्दीत एक सार्वजनिक व १० हजार २४० घरगुती

अलोरे-शिरगाव ठाणे हद्दीत ३ सार्वजनिक व ५, ४०० घरगुती

एकूणः १९ सार्वजनिक, ३२, १०४ घरगुती

loading image
go to top