चिपळूण : परशुराम घाट बंदबाबत आज होणार अंतिम निर्णय

वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था; २१ पासून बंदची शक्यता
परशुराम घाट बंदबाबत आज होणार अंतिम निर्णय
परशुराम घाट बंदबाबत आज होणार अंतिम निर्णयsakal

चिपळूण : येथील परशुराम घाट महिनाभर रोज दुपारी बारा ते सायंकाळी पाचपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत आज निर्णय झाला नाही. उपाययोजना व इतर व्यवस्थेबाबत बुधवारी (ता. २०) अंतिम निर्णय घेऊन २१ पासून घाट बंद होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली. प्रवाशांना अडचण येऊ नये म्हणून कळंबस्ते, आंबडस, चिरणीमार्गे लोटे अशी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. जड वाहनांसाठी चिपळूण- कऱ्हाड- पुणे या मार्गाचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले. चौपदरीकरणाची एक बाजू पूर्ण झाल्यावरच घाटातील वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण प्रगतिपथावर आहे. परंतु, येथील परशुराम घाट चौपदरीकरण कामात अडचणीचा ठरला आहे. येथील डोंगर कटाई करताना भूस्खलन व दरडी कोसळण्याच्या घटना सतत घडत आहेत. दोनच महिन्यांपूर्वी येथील डोंगर कापताना दरड कोसळून त्यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला होता. दोन पोकलेन मशिन मातीच्या ढिगाऱ्यात गाडले गेले होते. त्यापूर्वी पावसाळ्यात दरड कोसळून घरांचे नुकसान झाले होते.

घाटातील किमान एक पदरी रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे, तसेच वाहतूक सुरू राहावी या दृष्टिकोनातून बैठकीत चर्चा करण्यात आली. परंतु, काम सुरू असताना दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू राहिल्यास कामाला अडचण निर्माण होईल. तसेच दरडीचा धोका राहणार आहे. त्यामुळे काही काळ तरी घाटातील वाहतूक बंदच ठेवावी, या विषयावर एकमत झाल्यानंतर घाटातील वाहतूक दिवसातून किमान पाच तास बंद ठेवून कामाला गती

देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार २० एप्रिलपासून दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी हा निर्णय पुढे ढकलण्यात आला असून, बुधवारी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

घाट बंद काळात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये व प्रवाशांना त्याचा त्रास होता कामा नये यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. लहान चारचाकी गाड्यांसाठी चिपळूण कळंबस्तेमार्गे आंबडस, चिरणीमार्गे लोटे अशी वाहतूक व्यवस्था करण्यात आली असून, या मार्गाची डागडुजी करण्यात आली आहे. या मार्गावर दिशादर्शक फलक तसेच पुरेशी पोलिस व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून चिपळूण-कराडमार्गे पुणे या मार्गाचा वापर करण्याचे नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com