चिपळूण : ऑर्चीड बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली

अग्निशमन बंब दाखल होताच तातडीने पाण्याचा मारा करून आग नियंत्रणातआणण्यात आली
fire
fireSakal media

चिपळूण : शहरातील कावीळतळी भागातील ऑर्चीड बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सदनिकेमध्ये मंगळवारी रात्री ११.३० वाजता अचानक आग लागली. या आगीने अक्षरशः रौद्र रुप धारण केले. भीषण आगीचा सामना करत अग्नीशामक दालने या सदनिकेमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरूपपणे बाहेर काढले. कावीळतळी भागातील ऑर्चीड बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर सय्यद यांच्या सदनिकेत एक कुटुंब भाड्याने राहतो. त्यामध्ये १२ वार्षीय मुलासह पती -पत्नी असे तीन जणांचे कुटुंब भाड्याने राहते. मंगळवारी रात्री अचानक एसीजवळ असलेल्या स्वीज जवळ शॉर्टसर्किट झाले.

त्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे संबंधित कुटुंब आतध्येच अडकून पडले होते. त्यांनी आरडाओरडा करताच शेजाऱ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. मात्र घराचा मुख्य दरवाजा बंद होता. तसेच आतमध्ये धुराचे प्रमाणही वाढले होते. अखेर मुख्य दरवाजा तोडण्यात आला. त्याचवेळी माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन बंब दाखल होताच तातडीने पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्यात आली.

त्यानंतर आतमध्ये अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढले. यावेळी आग विजविण्यासाठी देवदास गावडे, अग्निशमन बंब वचालक-अभय गांधी, मनोज फरांदे, फायरमन संजय पवार, अमोल वीर, प्रतिक घेवडेकर, हर्ष कांबळी, सौरभ मोहिते यांनी संबंधित कुटुंबाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी किचन मधील सिलेंडर पासूनही धोका निर्माण झाला होता. मात्र शेजाऱ्यांनी अथक प्रयत्न करत तोही सुरक्षित पणे बाहेर काढला. त्यासाठी प्रमोद अभ्यंकर, गौरव गांधी, कौशल गांधी, सुधीर गांगण, भरत शिरगावकर, निरंजन रेडीज, मंगेश बहादूरे यांनी विशेष मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com