पूरग्रस्त नसलेले घेतायत मदत; चिपळूणातील चित्र

पूर ओसरल्यानंतर सर्व थरातून मदतीचा ओघ शहरासह परिसरात सुरू झाला आहे.
पूरग्रस्त नसलेले घेतायत मदत; चिपळूणातील चित्र

चिपळूण : शहरासह परिसरात महापुराने हाहाकार उडवल्यानंतर आता उद्ध्वस्त चिपळूणवासीयांसाठी हजारो हात मदतीसाठी जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरून सरसावले आहेत. मदत मोठ्या प्रमाणात मिळत असली तरी त्यामध्ये बाधित नसलेले मदत घेत असल्याचे दिसत आहे. चिपळुणात महापुराने थैमान घातले. त्यामध्ये मोठी जीवित तसेच वित्तहानी झाली. केवळ नेसलेल्या वस्त्रांशिवाय त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर सर्व थरातून मदतीचा ओघ शहरासह परिसरात सुरू झाला आहे. मदतीबाबत सुरवातीच्या चार दिवसांत कोणतेच नियोजन प्रशासनाकडून केले गेले नसल्याने बाहेरून येणारी मदत मधल्या मध्येच वाटली जात आहे.

ज्यांचे नुकसान झालेले नाही ते रस्त्याच्या कडेला उभे राहून, गाड्या अडवून मदत हिसकावून घेत आहेत. ज्यांची घरे आणि कार्यालये, दुकाने पुरात गेली आहेत ते आपली घरे, दुकाने साफ करीत आहेत. त्यांच्यापर्यंत मदतच पोहचत नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटनांनी बाधित व्यक्तींच्या घरात जाऊन मदत केल्यास ते अधिक योग्य ठरणारे आहे.

पूरग्रस्त नसलेले घेतायत मदत; चिपळूणातील चित्र
भुईबावडा घाटमार्गे वाहतूक 8 दिवसांत सुरु होणार

शहर परिसरातील बाधित लोकांना जिल्हा परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मदत येत आहे. मात्र या मदत वाटपात सुसूत्रता राहिलेली नाही. प्रशासनाने काही ठिकाणी मदत संकलित केंद्र सुरू केले आहे. अशा ठिकाणी येणारी मदत संकलित करून तिचे वाटप झाल्यास खऱ्या लाभार्थ्यांना मदत वाटपाचा दिलासा मिळेल.

- शौकत मुकादम, माजी सभापती, चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com