esakal | चिपळूण : पूररेषेविरोधात तक्रारींचा ‘महापूर’
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

चिपळूण : पूररेषेविरोधात तक्रारींचा ‘महापूर’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : संभाव्य पूररेषेच्या विरोधात येथे हरकतींचा अक्षरशः ‘महापूर’आला. तब्बल बारा हजारांहून अधिक हरकती नगरपालिकेत दाखल झाल्या. हरकती दाखल करण्यासाठी चिपळूण बचाव समितीने दोन दिवसांची मुदत वाढवून घेतली, त्यामुळे आणखी हरकती वाढणार आहेत.

संभाव्य पूररेषेसंदर्भात शासनाने नागरिकांकडून हरकती मागवल्या. चिपळूण बचाव समितीने त्यात पुढाकार घेतला. याविषयी दोन स्वयंसेवकांची नेमणूक करून आणि ध्वनिक्षेपकावरून जनजागृती करण्यात आली. हरकती घेण्यासाठी अर्ज छापण्यात आले आहेत. नागरिकांकडून ते भरून घेऊन एकत्रितरीत्या जमा करण्यासाठी चिपळूण बचाव समितीने पुढाकार घेतला. महिला, अपंग आणि वयोवृद्धांनीही पूररेषेवर हरकत असणारे अर्ज नगरपालिकेत दाखल केले.

हेही वाचा: कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटी-पीसीआर रिपोर्टची सक्ती कायम

वादग्रस्त पूररेषेबाबत नागरिकांच्या हरकती वाढत आहेत. त्यामुळे आम्ही आणखी दोन दिवस मुदत वाढवून घेतली. आणखी अर्ज छापले आहेत. ते पुढील दोन दिवसांत नागरिकांकडून भरून घेऊन पालिकेत जमा करू.

- अरुण भोजने, सदस्य, चिपळूण बचाव समिती

loading image
go to top