गणेशोत्सवात चिपळूणपर्यंत २२ गाड्या धावणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

गणेशोत्सवात चिपळूणपर्यंत २२ फेऱ्या सुरू केल्यामुळे आम्ही आभारी आहोत. यापूर्वी पनवेल ते चिपळूण डेमू चालवली जात होती. यावर्षी २२ फेऱ्या होणार असल्या तरी डेमू बंद करू नये. 
- शौकत मुकादम, अध्यक्ष - कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती

चिपळूण - गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ६० जादा गणपती विशेष गाड्या सोडणार आहे. सीएसएमटी ते चिपळूणपर्यंत २२ फेऱ्या धावणार आहेत. या फेऱ्यांच्या आरक्षणाची तारीख लवकरच रेल्वेकडून जाहीर केली जाणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली. यापूर्वी १४२ फेऱ्या चालवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये ६० फेऱ्यांची भर पडली आहे.

सीएसएमटी ते चिपळूण २२ फेऱ्या पुढीलप्रमाणे गाडी क्रमांक ०११७९ - सीएसएमटी येथून २० ऑगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी पाच वाजता सुटेल आणि चिपळूण येथे १०.२० वाजता पोचेल. गाडी क्रमांक ०११८० - चिपळूण येथून मंगळवारी, गुरूवारी आणि रविवारी १७.४५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे २३.४० वाजता पोचेल. पुणे ते सावंतवाडी ८ फेऱ्या पुढीलप्रमाणे गाडी क्रमांक ०१४३७ - पुणे येथून १८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक शुक्रवारी १६.३५ वाजता सुटेल. 

सावंतवाडी येथे दुसऱ्या दिवशी ४.२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४३८ - सावंतवाडी येथून २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक सोमवारी ८ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २१.२५ वाजता पोचेल. 

पनवेल ते सावंतवाडी ८ फेऱ्या- गाडी क्रमांक ०११८९ - पनवेल येथून १९ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान प्रत्येक शनिवारी १९.३५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ४.२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११९० - सावंतवाडी रोड येथून प्रत्येक शनिवारी ८ वाजता सुटून पनवेल येथे त्याच दिवशी १९.२० वाजता पोचेल- अशा आहेत. गाडी क्रमांक ०११९१ - पनवेल येथून २० ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान प्रत्येक रविवारी १९.३५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी येथे दुसऱ्या दिवशी ४.२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११९२ - सावंतवाडी येथून प्रत्येक रविवारी ७.१० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी १८.२० वाजता पोचेल, याही फेऱ्यांचा समावेश आहे.

एलटीटी ते करमाळी एकूण १४ फेऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. गाडी क्रमांक ०१०४३ - एलटीटी येथून १८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक शुक्रवारी १.१० वाजता सुटेल आणि करमाळी येथे ११ वाजता पोचेल. गाडी क्रमांक ०१०४४ - करमाळी येथून १८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक शुक्रवारी १३.०० वाजता सुटून एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी ००.२० वाजता पोचेल. गाडी क्रमांक ०१०४५ - एलटीटी येथून २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक सोमवारी १.१० वाजता सुटेल आणि करमाळी येथे ११ वाजता पोचेल. गाडी क्रमांक ०१०४६ - करमाळी येथून प्रत्येक सोमवारी १३.०० वाजता सुटून एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी १.२० वाजता पोचेल.

Web Title: chiplun konkan news 22 train go to shiplun in ganeshotsav