आरक्षण बंद झाल्यास मागासवर्गीय संकटात - दिनेश शिरीषकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

चिपळूण - सध्या शासन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व शिक्षण क्षेत्रात आरक्षण बंद करीत आहे. यामुळे भविष्यात मागासवर्गीय समाजांना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोपे राहणार नाही. याविरोधात संघटित झाले पाहिजे, असे आवाहन खेड तालुका रोहिदास समाजसेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश शिरीषकर यांनी केले.

रोहिदास समाजसेवा संघ सातगांव विभागाच्या वतीने आंबडस येथील मंगलमूर्ती सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळा व वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिरीषकर म्हणाले की, रोहिदास समाजसेवा सातगांव विभागाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. 
गेली आठ वर्षे विद्यार्थी गुणगौरव सोहळा व वह्या वाटप कार्यक्रम आयोजित केला जात आहे. 

या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 
प्रेरणा मिळत आहे. विद्यार्थ्यांनी यापेक्षा चांगली बक्षिसे मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जीवनात शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नाही. 

यामुळे विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेतले पाहिजे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण, खेड पंचायत समिती गटनेते जीवन आंब्रे, सदस्य कृष्णा लांबे, खेड रोहिदास समाजसेवा संघ तालुका कार्याध्यक्ष प्रकाश हेलगांवकर, उपाध्यक्ष रवींद्र खेडेकर, सहसचिव विजय सुसवीरकर, श्रीकांत देवळेकर, काशिराम पेवेकर, शेल्डीचे माजी सरपंच आत्माराम आंब्रे, धामणंद ग्रामपंचायत सदस्य सचिन उतेकर आदी उपस्थित होते. रोहिदास समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ. असे आश्‍वासन सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले. 

रोहिदास समाजसेवा सातगांव विभागाने सुरू केलेले हे कार्य यापुढेही सुरू राहावे, अशी अपेक्षा वक्‍त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागाध्यक्ष संतोष सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Web Title: chiplun konkan news backward class disaster by reservation close