चिपळूण पालिकेतर्फे विरेश्‍वर तलावाची स्वच्छता...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

चिपळूण - नगरपालिकेने विरेश्‍वर तलाव परिसरातील स्वच्छतेचे काम हाती घेतल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांनी ‘सकाळ’ आणि पालिकेचे याबद्दल आभार मानले. विरेश्‍वर तलाव परिसरातील अस्वच्छतेचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी या वृत्ताची दखल घेऊन तलाव परिसर स्वच्छ करण्याची सूचना आरोग्य विभागाला केली. 

चिपळूण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विरेश्‍वर तलाव आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विरेश्‍वर तलावाची स्वच्छता होत नसल्याने येथील नागरिकांमध्ये नाराजी होती. नागरिकांनी पालिकेकडे संपर्क साधल्यानंतर माणसे उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात होते. 

आरोग्य विभागाकडे वारंवार संपर्क साधूनही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे येथील नागरिकांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. ‘सकाळ’मध्ये ३१ मार्चच्या अंकात याबाबतचे वृत्त छायाचित्रांसह प्रसिद्ध करण्यात आले. त्याची दखल नगराध्यक्षांनी घेऊन तातडीने सफाई कामगारांना तलाव परिसरात पाठविले आणि तलाव परिसराची स्वच्छता करून घेतली. शहरातील नागरिक सकाळ, संध्याकाळ चालण्यासाठी तलावावर येतात. लहान मुले खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिक विरंगुळ्यासाठी सायंकाळी तलावावर येतात. तलावाच्या भोवती असलेल्या झाडांचा पालापाचोळा पडल्यानंतर तो उचलला जात नव्हता. त्याचा त्रास तलावावर येणाऱ्या सर्वच नागरिकांना होत होता.

आरोग्य विभागात कामगार कमी आहेत, ही वस्तुस्थिती आहे; परंतु वारंवार मागणी करूनही कामगार उपलब्ध करून न देणे चुकीचे आहे. शहरातील अनेक नागरिक मागण्या घेऊन पालिकेत येतात. खातेप्रमुखांना भेटतात. खातेप्रमुखांकडून मार्ग निघाला नाही, तर ते थेट माझ्याशी संपर्क साधतात. विरेश्‍वर परिसरातील नागरिकांनी थेट संपर्क साधला असता, तर मी तातडीने सफाई कामगार उपलब्ध करून दिले असते.
- सुरेखा खेराडे, नगराध्यक्षा-चिपळूण

सफाई कामगारांनी तलाव परिसरातील कचरा उचलल्यामुळे संपूर्ण तलाव मोकळा झाला आहे. लहान मुलांची खेळणी बसविलेली जागाही स्वच्छ झालेली आहे. ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नगराध्यक्षांनी त्याची दखल घेतली, त्याबद्दल ‘सकाळ’ आणि पालिकेचे आभार. एका ठिकाणी गोळा करून ठेवलेला कचरा घंटागाडीने उचलावा.
- महेश दीक्षित, नागरिक

Web Title: chiplun konkan news municipal vishweshwar pond cleaning