मंडईत किरकोळ भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

नगरपालिकेचा निर्णय - २५० विक्रेत्यांना मिळणार हक्काची जागा
चिपळूण - भाजी मंडईच्या परिसरातील मोकळ्या जागेत किरकोळ भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणी भाजी विक्रेत्यांनी पालिकेकडे केली होती. नगराध्यक्षांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याला होकार दिल्याने शहरातील रस्त्यावर होणाऱ्या भाजी विक्रीचा प्रश्‍न निकाली निघणार आहे. २५० भाजी विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध होणार आहे.

पूर्वीच्या भाजी मंडईतील भाजी विक्रेत्यांना शहरातील रस्त्यालगतची जागा तात्पुरत्या स्वरूपात व्यवसायासाठी देण्यात आली आहे. त्या विक्रेत्यांसह अनेक किरकोळ भाजी विक्रेते शहरातील रस्त्यालगतच्या जागेत बसून भाजीविक्री करतात. नवीन इमारतीमध्ये जुने भाजी विक्रेते गेले आणि किरकोळ भाजी विक्रेते रस्त्यालगतच्या जागेत व्यवसाय करू लागले. लाखो रुपये गुंतवून मंडईतील गाळे घेणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडे कोणी येणार नाही.

तसेच रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचा प्रश्‍न ‘जैसे थे’ राहील. त्याचा त्रास वाहतुकीलाही होणार असल्यामुळे सर्वच भाजी विक्रेत्यांना मंडईच्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी भाजी विक्रेत्यांकडून करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, बांधकाम सभापती आशीष खातू, शिवसेनेचे गटनेते शशिकांत मोदी, नगरसेवक मोहन मिरगल, नगरसेविका वर्षा जागुष्टे, सफा गोठे, सुमय्या फकीर, नूपुर बाचीम, नगरसेवक हारुण घारे, करामत मिठागरी, कबीर काद्री, मनोज शिंदे, अविनाश केळस्कर आदींनी भाजी मंडईच्या परिसराची पाहणी केली.

व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून नगरसेवक सुधीर शिंदे व दत्ता वाळूंज यांनी भाजी विक्रेत्यांचे प्रश्‍न मांडले. मंडईच्या समोरील २० फूट जागा पार्किंगसाठी आरक्षित ठेवावी. दोन्ही बाजूंच्या जागेत दोन ते अडीच फुटाचा भराव करून तेथे किरकोळ भाजी विक्रेत्यांना बसवावे. त्यांच्याकडून आता जेवढे भूभाडे घेतले जाते तेवढेच भूभाडे घ्यावे म्हणजे पालिकेचे उत्पन्न वाढेल. किरकोळ भाजी विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध होईल. सर्वच भाजी विक्रेते एकाच छताखाली येतील. भराव केलेल्या जागेवर पत्र्याची शेड टाकून मिळावी, अशा मागण्या सुधीर शिंदे यांनी मांडल्या. त्याला नगराध्यक्षांनी होकार दिल्याने विक्रेत्यांचा प्रश्‍न निकाली निघणार आहे.

Web Title: chiplun konkan news rehabilitation of mandai retailers