दररोज १६-१७ तास अभ्यास, तणाव कधीही नाही!

नागेश पाटील
मंगळवार, 27 जून 2017

सलोनीच्या यशाची सूत्रे : खेडची विद्यार्थिनी देशात दुसरी
चिपळूण - जीवनात निश्‍चित केलेले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रमाला जिद्द व चिकाटीची जोड दिल्यास उच्च कोटीचे यश मिळू शकते हे खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सलोनी जोशी हिने दाखवून दिले आहे. दहावी सीबीएसई बोर्डात ती देशात दुसरी आली. १७, १८ तास अभ्यास करूनही कधी थकवा जाणवला नाही. नियमित आहार तोच घेतला. तणाव कधीच नव्हता, हीच यशाची सूत्रे असल्याचे तिने सांगितले. 

खेड येथील डॉ. सुनील जोशी व डॉ. सौ. शर्वरी जोशी या दाम्पत्याची सलोनी ही कन्या. खेडमधील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलची ती विद्यार्थिनी. ‘सकाळ’शी बोलताना सलोनी म्हणाली, सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत शाळा. घरी आल्यावर पुन्हा तीन तास अभ्यास. हा दिनक्रम नियमित सुरू ठेवला. दहावी परीक्षेपूर्वी शेवटचे तीन महिने प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचा सराव केला.

अभ्यासक्रमाला पूरक असलेल्या पुस्तकाचे नियमित वाचन केले. त्यातून स्वतःचे नवीन प्रश्‍न बनवले व त्याची उत्तरे सोडवली. कधीही मनावर ताण तणाव जाणवून दिला नाही. शाळेतच ताणतणावाबाबत मार्गदर्शन मिळाले.

सलोनी सातवी शिष्यवृत्तीमध्ये राज्यात सातवी, महाराष्ट्र ऑलिंपियाड परीक्षेतही राज्यात सातवी, आठवीत चिपळुणातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मोहन भिडे यांच्याकडून महाराष्ट्र ऑलिंपियाड मुव्हमेंट या स्पर्धा परीक्षेचे धडे मिळाले. येथूनच तिच्या शैक्षणिक आयुष्याला कलाटणी मिळाली. मॉम परीक्षेत ती जिल्ह्यात पहिली, राज्यात पहिल्या ३५ विद्यार्थ्यामध्ये तिची निवड झाली. आई, वडील व शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि घरातील अभ्यासाच्या जोरावरच तिने देशात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. 

अकरावीतही रोटरीत प्रवेश
दहावीतील यशानंतर रोटरी इंग्लिशमध्येच तिने अकरावीला प्रवेश घेतला असून बारावीचा अभ्यास यावर्षीच सुरू केला आहे. आजही सलोनी दररोज १८ तास  अभ्यास करते. बारावीनंतर तिला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावयाचे आहे.

Web Title: chiplun konkan news saloni joshi success