विद्यार्थी होणार आता स्वच्छतादूत

नागेश पाटील 
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

चिपळूण - राज्यातील खेड्यापाड्यात स्वच्छतेचा मंत्र पोचविण्यासाठी राज्य सरकारने आता शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतादूत बनविण्याचा निर्णय घेतला आहे. लहान मुलांचा हट्ट पालक जरूर पुरवितात. लहान मुलांनी खाऊ नको शौचालय हवे असा आग्रह धरला, तर राज्यातील ‘स्वच्छ भारत मिशन’ पूर्णत्वास जाईल, असा विश्वास सरकारला वाटतो. त्यामुळेच स्वातंत्र्यदिनी शालेय विद्यार्थ्यांनाच हागणदारीमुक्त गाव आणि स्वच्छतेची शपथ देण्यात येणार आहे. 

रत्नागिरी जिल्हा हागणदारीमुक्त व्हावा यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात ९० टक्‍क्‍यांहून अधिक काम पूर्णत्वास गेले आहे. सुमारे आठ ते दहा हजार शौचालये उभारण्याचे काम बाकी आहे. प्रत्येक कुटुंबाने शौचालय उभारण्यासाठी गाव पातळीवर शिवार फेऱ्या काढण्यात आल्या. विशेष ग्रामसभा झाल्या. गाव तसेच तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेत ग्रामस्थांमध्ये जागृती करण्यात आली. यामुळे मागील दोन वर्षांत मोठ्या संख्येने शौचालयांची उभारणी झाली. शौचालय उभारणीसाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येकी १२ हजारांचे अनुदानही देण्यात आले. जागेच्या अडचणी, नोकरीनिमित्त परजिल्ह्यात वास्तव्य आदी बाबींमुळे जिल्ह्यातील सुमारे ८ ते १० हजार कुटुंबामध्ये शौचालयाची व्यवस्था नाही. ते उभारण्याचे आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे. आई-वडील नेहमीच मुलांचे हट्ट पुरवितात मुलांनी घरात शौचालय उभारण्याचा व वापरण्याचा आग्रह धरला तर स्वच्छता अभियान यशस्वी होऊ शकेल. शालेय विद्यार्थी ‘स्वच्छतादूत’ म्हणून प्रभावी काम करतील. त्यामुळे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी प्रत्येक शाळेत ध्वजवंदनानंतर विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत तशा प्रकारची शपथ घेण्याची सूचना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. येथील गटविकास अधिकारी सरिता पवार यांनीही तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतींना तशा सूचना दिल्या आहेत.

Web Title: chiplun konkan news Students are going to become cleaners