बावीस वाड्यांची टॅंकरची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

चिपळूण - तालुक्‍यात उन्हाचा कडाका वाढत असून पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. पाणीपुरवठा योजनांचे विहिरींचे स्रोत आटल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. परिणामी, तालुक्‍यातील २२ वाड्यांनी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. संबंधित गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी अधिगृहीत केलेल्या टॅंकरची दुरुस्ती सुरू असून लवकरच टॅंकर सुरू होण्याची शक्‍यता आहे.

गतवर्षी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी झालेला खर्च पंचायत समितीस मिळालेला नाही. टॅंकरसाठीचे डिझेल, चालकांचा भत्ता आदींचे मिळून आठ लाखांचे देणे आहे. यावर्षीपासून चार लाखांची मागणी करण्यात आली आहे. हा निधी अद्याप पंचायत समितीस मिळालेला नाही. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी विविध शासकीय विभागांचे ४ टॅंकर अधिगृहीत केले आहेत. यातील एका टॅंकरची दुरुस्ती सुरू आहे. दुरुस्ती पूर्ण होताच टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. तालुक्‍यातील कोंडमळा-धनगरवाडी, शिरवली, दहिवली बुद्रुक मुकनाकवाडी, कळकवणे, टेरव-धनगरवाडी, दत्तवाडी, अडरे-धनगरवाडी, कुटरे- शिर्केवाडी, बांदेकोंड, ओमळी-कामळेवाडी, निवळी, परशुराम पायरवाडी, कामथे खुर्द-धनगरवाडी, कोसबी-घाणेकरवाडी, डिकेवाडी, केतकी-बौद्धवाडी, ओवळी-खालचीवाडी, सुतारवाडी, मधलीवाडी, देवाडी, बुरंबवणे, धनगरवाडी आदी २२ वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. टॅंकर सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ वारंवार पंचायत समितीत हेलपाटे मारत आहेत. गेल्या काही वर्षांत प्रथमच टंचाईसाठी निधीची समस्या निर्माण झाली आहे.

Web Title: chiplun konkan news water tanker demand