कॉंग्रेसच्या प्रभारी निवडीत राणे पिता-पुत्रांवर कुरघोडी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

चिपळूण - रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेसचे प्रभारी म्हणून विश्‍वनाथ पाटील यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. राणेंनी पक्ष सोडण्यापूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यासाठी नवीन प्रभारी नेमून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माजी खासदार नीलेश राणेंवर निशाणा साधला आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत चव्हाण यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना "कुणी एकाने पक्ष सोडला तर दुसऱ्याला संधी मिळेल', असे त्यांनी सांगितले होते. पाटील यांच्या नियुक्तीने चव्हाण यांनी प्रत्यक्ष कृती केली आहे. 

नारायण राणेंच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले होते. राणेंच्या गटाने जिल्ह्याची सूत्र हाती घेतली होती. तत्कालीन जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी राजीनामा दिल्यानंतर गेली अडीच वर्ष हे पद रिक्त आहे. माजी खासदार नीलेश राणे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड व्हावी, असा ठराव जिल्ह्यातून झाला होता; मात्र कॉंग्रेसच्या जुन्या गटातील लोकांना ते मान्य नव्हते. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाध्यक्षपदावर चर्चा करताना नीलेश राणे व आमदार भाई जगताप यांच्यात वाद झाला. त्यानंतर राणेंनी माघार घेऊन जिल्हाध्यक्षपदासाठी आपल्या समर्थकाची शिफारस केली. त्यालाही प्रदेश कॉंग्रेसने मंजुरी दिली नाही. राणेंनी केवळ सिंधुदुर्ग बघावे असा काहींचा हट्ट होता. त्यामुळे नाराज झालेल्या नीलेश राणेंनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यावर टीका केली होती. 

सध्या राणेंच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता, "कुणी एक पक्षातून गेला, तर दुसऱ्याला संधी मिळेल' असे सांगितले होते. त्यानंतर नीलेश राणेंनी अशोक चव्हाणांवर पुन्हा आरोप केले. राणेंनी पक्ष सोडला, तर संघटनेवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्ह्यापासून संघटनात्मक निवडीला सुरवात केली. राणेंनी पक्ष सोडला तरी आमच्याकडे कार्यकर्ते तयार आहेत, असाच संदेश चव्हाण यांनी पाटील यांच्या निवडीतून दिला आहे. विश्‍वनाथ पाटील प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस आहेत. कुणबी सेनेच्या माध्यमातून त्यांचा कोकणात लोकसंपर्क आहे. कॉंग्रेसतर्फे त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

Web Title: chiplun news congress ashok chavan narayan rane