मृत महिलेच्या पतीची  तक्रार घेण्यास नकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

चिपळूण - तालुक्‍यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील सर्पदंश झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या पतीने पोलिसांकडे तक्रारीसाठी धाव घेतली; मात्र जिल्हा परिषदेकडून चौकशी होत असल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. जि. प.च्‍या चौकशी पथकाने महिलेचे नातेवाईक वा इतर कोणालाही बोलावले नसल्याने या चौकशीबाबत संशय आहे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

संबंधितांची चौकशी करून दोषींना त्वरित निलंबित करावे. तसेच चौकशी करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घ्यावे, अन्यथा रुग्णालयावर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढला जाईल, असा इशारा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रताप शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला. सर्पदंश झालेल्या जरिना गायकवाड यांना कामथे रुग्णालयात उपचारास दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. कांचन मदार यांनी तत्काळ रुग्णांवर उपचार केले नाहीत. रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वादविवाद झाले. ही बाब मानवतेला काळिमा फासणारी असल्याचे यात म्‍हटले आहे.

शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा रुग्णालयातून एक चौकशी पथक कामथे रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याची स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती दिली नाही. चौकशी करताना मृत महिलेच्या नातेवाइकांचा जबाब घ्यायला हवा होता. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींकडून देखील माहिती घ्यायला हवी होती. तसे न झाल्याने चौकशी समितीच्या भूमिकेविषयी साशंकता आहे. याबाबत पालकमंत्री रवींद्र वायकर व आरोग्यमंत्री. डॉ. दीपक सावंत यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे यांनी सांगितले. दरम्यान, मृत महिलेच्या पतीने शिरगाव पोलिस ठाण्यात काल (ता. ७) धाव घेतली. पत्नीच्या मृत्यूस कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. जिल्हा परिषदेकडून संबंधितांची चौकशी सुरू असल्याने त्वरित गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला. दरम्यान, कारवाईसाठी सेनेसह राष्ट्रवादीचाही दबाव वाढला आहे. या दोन्ही पक्षांकडून विविध पद्धतीने पाठपुरावा सुरू आहे.

Web Title: chiplun news crime