प्राध्यापकांनी टाकला सुटकेचा निःश्वास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

चिपळूण - मुंबई विद्यापीठाचे २७ हजार ५४७ पेपर डीबीजे महाविद्यालयातील केंद्रावर ऑनलाईन तपासण्यात आले. ९९ टक्के पेपर तपासणी संपल्यामुळे प्राध्यापकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. अध्यापनाचे काम सोडून गेली काही दिवस प्राध्यापक ऑनलाईन पेपर तपासणीच्या कामात गुंतले होते. 

चिपळूण - मुंबई विद्यापीठाचे २७ हजार ५४७ पेपर डीबीजे महाविद्यालयातील केंद्रावर ऑनलाईन तपासण्यात आले. ९९ टक्के पेपर तपासणी संपल्यामुळे प्राध्यापकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. अध्यापनाचे काम सोडून गेली काही दिवस प्राध्यापक ऑनलाईन पेपर तपासणीच्या कामात गुंतले होते. 

मुंबई विद्यापीठाने यावर्षी प्रथमच ऑनलाईन पेपर तपासणीचा प्रयोग हाती घेतला होता. ऑनलाईनची निविदा प्रक्रिया उशिरा झाल्यामुळे पेपर तपासणीला उशिरा झाला. ३१ जुलैपर्यंत पेपर तपासणी पूर्ण करण्याचा इशारा राज्यपालांनी विद्यापीठाला दिला होता. मात्र, वेळेत पेपर तपासणी झाली नाही. पेपर तपासणी झाल्यानंतर निकाल तयार करण्याचे काम असल्यामुळे ५ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील, असे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. 

विद्यापीठाचे पेपर ऑनलाईन तपासण्यामध्ये डीबीजे महाविद्यालयाने महत्त्वाची भूमिका बजावली. ऑनलाईन पेपर तपासण्यासाठी २६ संगणकाची व्यवस्था केली होती. गुहागर तालुक्‍यातील खरे ढेरे महाविद्यालय व पाटपन्हाळे महाविद्यालय, चिपळूण तालुक्‍यातील सावर्डे महाविद्यालय, मंदार कॉलेज, तात्यासाहेब नातू कॉलेज आणि खेड तालुक्‍यातील ज्ञानदीप कॉलेजचे प्राध्यापक ऑनलाईन पेपर तपासण्यासाठी डीबीजे महाविद्यालयाच्या केंद्रावर येत होते. ३१ जुलैपूर्वी कला आणि शास्त्र शाखेची पेपर तपासणी पूर्ण झाली होती. ३१ जुलैला सायंकाळपर्यंत २७ हजार ३४७ पेपर डीबीजे महाविद्यालयात ऑनलाईन तपासले. त्यामध्ये कला शाखेचे ८ हजार ८००, वाणिज्य शाखेचे १४ हजार ७४२ आणि शास्त्र शाखेचे ३ हजार ८०५ पेपर तपासण्यात आले. १ ऑगस्टला वाणिज्य शाखेचे २०० पेपर तपासण्यात आले. एकूण २७ हजार ५४७ पेपर ऑनलाईन तपासण्यात आले. ९९ टक्के पेपर तपासणी पूर्ण झाल्यामुळे प्राध्यापकांनीही सुटकेचा श्‍वास घेतला.

Web Title: chiplun news professor education