चिपळूण : वाशिष्ठीचा दुसरा पूल १५ मे पूर्वी खुला होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशिष्ठीचा दुसरा पूल १५ मे पूर्वी खुला होणार

चिपळूण : वाशिष्ठीचा दुसरा पूल १५ मे पूर्वी खुला होणार

चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणांतर्गत वाशिष्ठी नदीवर उभारलेल्या दुसऱ्या पुलही १५ मे पर्यंत खुला करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर नवीन पूल वाहतुकीस सुरू झाल्यानंतर आधीच्या पुलावरील कॉंक्रिटीकरणातील बाहेर पडलेल्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

गतवर्षी २३ जुलैला झालेल्या अतिवृष्टीत वाशिष्ठी नदीवरील ब्रिटिशकालीन जुन्या पुलाचा जोडरस्ता वाहून गेला होता. त्यामुळे धोकादायक बनलेल्या या मार्गावर काही दिवस वाहतूक बंद ठेवावे लागली होती. या परिस्थितीमुळे चौपदरीकरणातील नवीन पुलाचे काम अतिशय घाईघाईने करावे लागले होते. त्यासाठी २४ तास काम सुरू ठेवून व अतिरिक्त यंत्रणा वापरून हे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर४ सप्टेंबर २०२१ ला खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत या पुलाचे लोकार्पण केले होते; मात्र घाईघाईत झालेल्या या कामाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. कॉंक्रिटीकरणातील स्टील जागोजागी बाहेर पडल्याने वाहतूकदारांना धोका निर्माण झाला आहे; मात्र आता वाहतूक थांबवून काम सुरू करणे शक्य नाही. त्यासाठी बाजूलाच उभारलेल्या दुसऱ्या पुलाचे काम लवकर मार्गी लावणे हा एकमेव पर्याय राहिला आहे. त्यानुसार दुसऱ्या पुलाचे काम वेगाने सुरू केले असून ते अंतिम टप्प्यात आले.

दुसऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील जोडरस्त्याचे काम पूर्णत्वास गेले असून त्यावर डांबरीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण करून १५ मे आधी कोणत्याही परिस्थितीत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा पूल खुला झाल्यानंतर आधीच्या पुलावर डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच हो दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.

२४ तास ठेवावा लागत होता पोलिस बंदोबस्त

वाशिष्ठीच्या जुन्या धोकादायक पुलामुळे दरवर्षी पावसाळ्यात अनेक अडचणी येत होत्या. अनेकदा अतिवृष्टीचा अंदाज घेऊन पुलावरील वाहतूक बंद ठेवावी लागत होती. त्यासाठी २४ तास पोलिस बंदोबस्तही ठेवावा लागत होता; मात्र आता दोन्ही पूल वाहतुकीस खुले होत असल्याने ही समस्या कायमची दूर होणार आहे.

Web Title: Chiplun Second Bridge Vashishti Opened Before

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top