शिवसेनेकडून महामार्गावरील खड्ड्यांत वृक्षारोपण 

chiplun shiv sena protest on mumbai goa highway
chiplun shiv sena protest on mumbai goa highway

चिपळूण - येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मुंबई-गोवा महामार्गाचे खड्डेमुक्त डांबरीकरण करून देण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले होते; मात्र महिना झाला तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आता त्या खड्ड्यांतच झाडे लावून निषेध करत शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी बोंबाबोंब आंदोलनाच्या पहिल्या अंकाची घंटा वाजवली आहे. 

या निषेधाची सुरवात कामथे येथील इगल इन्फ्रा कंपनीसमोर करण्यात आली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची चाळण झालेली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर डांबरीकरणाने खड्डे भरून खड्डेमुक्त महामार्ग करून देण्याचे आश्‍वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दिले होते. सेनेचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी खड्ड्यांविरोधात महामार्गावर बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर सावर्डे पोलिस ठाण्यात राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक झाली होती; मात्र महिनाभराचा कालावधी उलटला तरी खड्डे भरण्याचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. दरम्यान, खड्ड्यांबाबत ठेकेदार फारशा हालचाली करीत नसल्याने सावंत यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत महामार्गावर झाडे लावून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख संभाजी खेडेकर, विभागप्रमुख रामभाऊ डीगे, युवासेना उपतालुका अधिकारी संजय चांदे, युवासेना आयटीसेल तालुका अधिकारी मंदार निर्मळ, शाखाप्रमुख रवी डीगे, कापसाळ सरपंच सुनील गोरीवले, नाना महाडिक, संतोष महाडिक, अशोक डीगे, उमेश खेडेकर, नरेश कांबळी, संजय डीगे, वासुदेव खेडेकर व असंख्य शिवसैनिक, युवा सैनिक उपस्थित होते. 

हे पण वाचामतदान नाही म्हणून रस्ता नाही
 
खड्ड्यांत झाडे लावण्याची परवानगी... 
चौपदरीकरणाच्या कामानेही गती पकडलेली नाही. अत्यंत धीम्या गतीने कामे सुरू आहेत. या विरोधात शिवसेना आक्रमक झाली. तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंत्यांकडे महामार्गावरील खड्ड्यांत झाडे लावण्याची लेखी परवानगी मागितली होती; मात्र ती अद्याप दिलेली नाही. 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com