चिपळूणात भगवा फडकणार? सावर्डे गटात आमदार समर्थकांचे मेळावे

चिपळूण ः सावर्डे गटामध्ये आजी-माजी आमदार समर्थकांचे जोरदार मेळावे घेत आहेत.
चिपळूण ः सावर्डे गटामध्ये आजी-माजी आमदार समर्थकांचे जोरदार मेळावे घेत आहेत. sakal

चिपळूण : काही दिवसांपूर्वीच कोकरे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीतील आमदार भास्कर जाधव समर्थक शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर या विभागात शिवसेनेतील अंतर्गत राजकारण तापले आहे. यातून आमदार भास्कर जाधव (Bhskar Jadhav)आणि माजी आमदार सदानंद चव्हाण (Sadanand Chavan)समर्थकांमध्ये जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीवरून वादाची ठिणगी पडली. त्याचे पडसाद आमदार जाधव यांनी सावर्डे येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उमटले. त्यानंतर आता बुधवारी (ता. २०) सावर्डे तसेच कोकरे जिल्ह्यातील गटात सदानंद चव्हाणांच्या उपस्थितीत विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कुटरे येथे होणाऱ्या कार्यक्रमात माजी आमदार सदानंद चव्हाण नेमके काय बोलतात, याकडे तालुक्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागलेले आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत. इच्छुक पदाधिकारी उमेदवारी मिळण्यासाठी फिल्डिंग लावत आहे तर काहींनी थेट निवडणुकीच्या कामासही सुरवात केली आहे.

या गटात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी येथील पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. त्यानुसार गावोगावी बैठकाही घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सावर्डे तसेच कोकरे गटातील विकास कामांचे भूमिपूजन माजी आमदार चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने मांडकी लोंढेवाडी पाणी योजना, डेरवण गुरववाडी पाणीयोजना, दुर्गवाडी मेनकोंड कदमवाडी पाणी योजना, कुटरे येथील मुख्यमंत्री सडक योजनेतून होणारा रस्ता, कुशिवडे पाणी योजना विहीर बांधणे, कुशिवडेतीलच व्यायामशाळा उद्घाटन माजी आमदार सदानंद चव्हाणांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे आमदार जाधवांनी केलेल्या टीकेस ते कशा प्रकार उत्तर देतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

चिपळूण ः सावर्डे गटामध्ये आजी-माजी आमदार समर्थकांचे जोरदार मेळावे घेत आहेत.
तोंडात सोन्याचा चमका घेऊन जन्मलेल्या जयंत पाटलांचे ताळतंत्र सुटलंय

अंतर्गत कुरबुरी वाढल्या

गेली १० वर्षे संतोष चव्हाण आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय सामना रंगत होता; मात्र आता चव्हाण सेनावासी झाल्याने अंतर्गत कुरबुरी वाढल्या आहेत. गेल्या १० वर्षात माजी आमदार चव्हाणांनी कोकरे गटात नियमित संपर्क ठेवला आहे. येथील विकासकामांनाही वेळोवेळी निधी दिला. येथील सेनेचे कार्यकर्तेही त्यांचे एकमुखी नेृत्वत मानतात; मात्र आमदार जाधवांनी, सदानंद चव्हाण यांना लक्ष्य केल्याने कोकरे गटातील शिवसेनेचे कार्यकर्ते अचंबित झाले आहेत.

..तर या प्रवृत्तीला थाऱा मिळणार नाही

काही दिवसांपूर्वी कोकरे गटातील राष्ट्रवादीचे माजी उपसभापती संतोष चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या कार्यक्रमास माजी आमदार सदानंद चव्हाण यांना टाळल्याने शिवसैनिक नाराज नाराज झाले होते. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सदानंद चव्हाण यांनी निवडणुकीच्या तोंडावर केवळ उमेदवारीसाठी शिवसेनेत दाखल झाले तर या प्रवृत्तीला थाऱा मिळणार नसल्याचा इशारा दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com