सिनेमॅटिकद्वारे विवाह सोहळा ‘ऑफबीट’

सिनेमॅटिकद्वारे विवाह सोहळा ‘ऑफबीट’

रत्नागिरी - विवाह सोहळ्यात सिनेमॅटोग्राफीची क्रेझ वाढू लागली आहे. येथील युवा फोटोग्राफर्सनी एकत्र येऊन ‘ऑफबीट आर्टिस्ट’द्वारे सिनेमॅटोग्राफिक व्हिडिओ साकारण्यात आगळावेगळा ठसा उमटवला आहे. ड्रोन कॅमेरा, फुल फ्रेम कॅमेऱ्यावरील चित्रीकरण पाहताना बॉलिवूडचा भास होतो. 

विवाहासाठी आता नवनवीन डेस्टिनेशन कोकणात सज्ज होत आहेत. अल्बम घेण्याऐवजी कलात्मक, करिझ्मा, बुकलेट अल्बम करण्याकडे कल आहे. तरुणांना सिनेमॅटिक व्हिडिओसुद्धा लागतो. ऑफबीट आर्टिस्टतर्फे अपरिचित अशा ठिकाणी चित्रीकरण, छायाचित्रण करून ही स्थळे पर्यटकांसमोर आणण्याचे काम ऑफबिट आर्टिस्ट करत आहेत. त्यासाठी ड्रोन कॅमेरे, ट्रॉली, स्लायडर, गिम्बल, फुलफ्रेम कॅमेरे व त्यासाठी लागणाऱ्या प्राईम लेन्सचा वापर केला जातो.

विवाह सोहळ्याची एक आकर्षक कथा गुंफली जाते. मग त्यात घरातल्या व्यक्तींच्या थोडक्‍यात मुलाखती, लग्न कसे जमले, हे वधू-वर सांगतात. दोन मिनिटांचा टिजर, पाच मिनिटांचे गाणे व १५ मिनिटांचा सिनेमॅटिक व्हिडिओ बनवण्याकरिता एचडी क्वालिटीच्या शूटिंगचा तब्बल २०० जीबी डाटा होतो. त्यातून निवडक शूटिंग संकलन करण्यासही कौशल्य आणि दर्जेदार सॉफ्टवेअर लागते. मॅनेक्‍यू चॅलेंजमध्ये एकाच वेळी साऱ्यांना स्थिर ठेवून चित्रीकरण केले जाते. त्या क्षणाला प्रत्येक जण काय करत असतो, हे चित्र पाहणे खूपच सुंदर वाटते.

ऑफबिट आर्टिस्टमध्ये छायाचित्रकार परेश राजिवले, साईप्रसाद पिलणकर, अनिकेत दुर्गवली, विनय बुटाला, नीलेश कोळंबेकर, सिद्धेश बंदरकर, सिद्धांत शिंदे, निखिल पाडावे, साई माचकर, वजीर अमिनगड यांचा समावेश आहे. रत्नागिरीप्रमाणे पुणे, मुंबई, केरळ, बेंगलोर या भागांतही जाऊन ऑफबिटने रत्नागिरीचे नाव उंचावले आहे.

वन शॉट साँग
सिनेमॅटिकप्रमाणे वन शॉट साँग हासुद्धा एक नवा प्रकार लोकांना आवडू लागला आहे. एका गीतामध्ये संपूर्ण लग्न सामावलेले असते. त्यासाठी कॅमेरामन व सहाय्यकांची मोठी फळी लागते. कोरिओग्राफरची भूमिका महत्त्वाची असते. प्रीवेडिंग, मॅटर्निटी शूट, प्री बर्थडे व बर्थडे शूट कॅंडिड, इनव्हिटेशन व्हिडिओ या व्हिडिओंनाही मागणी वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com