हवामान बदलाचा विपरीत परिणाम रानमेव्यावर

लक्ष्मण डुबे 
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

रसायनी (रायगड) : हवामान बदलाचा विपरीत परिणाम यंदाच्या वर्षी जांभळे, करवंद, काजु, या रानमेव्यावर झाला आहे. या वर्षी पिक कमी आले असल्याने खेडयातील शेतकरी व वाडयांतील आदिवासी हाताश झाले आहे. मोहोपाडा बाजार पेठेत कमी प्रमाणात जांभळे, काजु हा रानमेवा विक्रीसाठी येऊ लागला आहे. थोडया दिवसात जांभळांची आवक वाढेल असे सांगण्यात आले. 

रसायनी लगतच्या कर्नाळा किल्ल्याच्या आणि पाताळगंगातील घेरामणिक गडाच्या डोंगर रांगात अनेक आदिवासी वाडया आहेत. यातील अनेक आदिवासी बांधवाना खास आसे उपजिवीकेचे साधन नाही. या आदिवासी वाडयांतील बांधवांना आणि खेडयातील काही शेतक-यांना ऊन्हाळयात जांभळ, करवंद, आंबे, काजु आदि जंगलातील रानमेवा विकुन घर खर्चाला दर वर्षी चांगला आधार होत आहे. मात्र या वर्षी पिक कमी आले आहे. त्यामुळे आदिवासी काळजीत पडले आहे. 

मागील वर्षी पाऊस चांगला झाला. त्यानंतर थंडीही चांगली पडली. फळ झाडांना मोहर येत असताना ढगाळलेले हवामान, पडणारे धुके, आणि आवकाळी पाऊस या खराब हवामानाचा झाडांना मोहोर येताना परिणाम झाला असे राम पवार यांने सांगितले.  दरम्यान या वर्षी रानमेव्याचे पिक कमी आले आहे. तसेच मोहोपाड बाजार पेठेत जांभळ, काजु विक्रीसाठी येऊ लागले आहे. जांभळाला किलोला सुमारे सव्वाशे रूपये भाव मिळत असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: The climate change effect on fruits