सीएनजीचा तुटवडा राज्यभरात ;भारद्वाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CNG shortage across the state Bhardwaj ratnagiri

सीएनजीचा तुटवडा राज्यभरात ;भारद्वाज

रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यात सीएनजी गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. चीन आणि युरोपमधूनच गॅसचा कमी पुरवठा होत असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यात पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने अनेक वाहनधारकांनी गॅस किट बसवल्याने गॅसची अपेक्षापेक्षा जास्त मागणी वाढली आहे. तुटवड्यामुळे मागणी तेवढा पुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे आणखी काही महिने राज्यात सीएनजी गॅसची हीच परिस्थिती राहील, असे मत येथील अशोका सीएनजी गॅसचे प्रमुख भारद्वाज यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. सीएनजी वाहने खरेदी करण्यासाठी यापूर्वी कंपनीकडून अनेक योजना जाहीर करण्यात आल्या होत्या तसेच त्याची मागणी वाढू लागल्याने अनेक ठिकाणी सीएनजी पंप उभारण्यात आले. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असून आता ११२ रुपये लिटर झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता पेट्रोलची वाहने चालवणे महागात पडू लागले आहे. सीएनजी गॅसचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे राज्यात सीएनजीच्या वाहनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारताला चीन आणि युरोपमधून सीएनजी गॅसचा पुरवठा होता; मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या पुरवठ्यामध्ये २५ ते ३० टक्के कपात झाली आहे. जो गॅस उपलब्ध होतो, तोच सर्वत्र पुरवला जातो.

आणखी काही महिने समस्या ...

गॅसच्या माणगीपेक्षा पुरवठा कमी असल्याने त्याचे वितरण करताना कंपन्यांनी प्राधान्यक्रम ठरवला आहे. त्यानुसार वाहने आणि घरगुती वापरासाठी हा गॅस वितरित केला जात आहे. चीन आणि युरोपकडून कमी पुरवठा होत असल्याने सीएनजीचा देशभरात तुटवडा असल्याचे कंपनीने सांगितले. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी वाहनांच्या रांगाच्या रांगा लागत आहेत. रिक्षाचालकांनाही अडीच ते तीन तास रांगेत उभा राहावे लागत आहे. गॅसला अपेक्षित दाब नसल्याने त्याचा तोटा वाहनधारकांना बसत आहे. त्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे, हे जाणून घेतल्यानंतर भारद्वाज यांनी ही माहिती दिली. पुढील काही महिने गॅसची ही समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

Web Title: Cng Shortage Across The State Bhardwaj Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top