रत्नागिरी : गुहागर किनाऱ्यावर तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hovercraft

रत्नागिरी : गुहागर किनाऱ्यावर तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट

गुहागर - गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर भारतीय तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट थांबवण्यात आले आहे. हे हॉवरक्राफ्ट गुजरातकडे जाणार आहे. तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेल्या आत्पकालीन स्थितीत गुहागरला थांबावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आठवडाभरापूर्वी अशाच पद्धतीने एक हॉवरक्राफ्ट दापोली तालुक्यातील किनाऱ्यावर उतरले होते.

भारतीय तटरक्षक दलाचे हे हॉवरक्राफ्ट मेंगलोरहून गुजरातकडे जात होते. गुहागर परिसरात खोल समुद्रात असताना हॉवरक्राफ्टच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्याची दुरुस्ती करण्यासाठी मुंबईतून तटरक्षक दलाचे जवान निघाले आहेत. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर हॉवरक्राफ्ट मार्गस्थ होणार आहे. या हॉवरक्राफ्टमध्ये तटरक्षक दलाचे १४ जवान आहेत. गुहागर वरचापाट येथे दुर्गादेवी मंदिरासमोरील समुद्रकिनाऱ्यावर हे हॉवरक्राफ्ट उभे आहे. याची माहिती मिळताच गुहागरचे पोलिस निरीक्षक बी. के. जाधव यांनी हॉवरक्राफ्टमधील अधिकाऱ्यांची भेट घेतली. समुद्रकिनाऱ्यावर उभे असलेले हॉवरक्राफ्ट पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली तर त्याचा त्रास होऊ नये, म्हणून दोन जवानांना समुद्रकिनाऱ्यावर नियुक्त केले. कोणतीही अडचण असेल तर सांगा, सर्व प्रकारची मदत करू, असे आश्वासित केले.

Web Title: Coast Guard Hovercraft On Guhagar Coast

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top