विद्यार्थ्यांनी बनविले नारळाचे खाद्यपदार्थ आणि शोभेच्या वस्तू

Coconut cuisine and ornamental items made by students
Coconut cuisine and ornamental items made by students

रत्नागिरी : नारळापासून अनेकविध शोभिवंत वस्तू, खोबर्‍यापासून चविष्ट, रुचकर खाद्यपदार्थ यांचा प्रसार होण्यासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 30 प्रकारच्या शोभेच्या वस्तू आणि नारळापासून केक, खीर, कटलेट, वड्या असे 50 खमंग खाद्यपदार्थ बनवले. या सार्‍याचे प्रदर्शन लक्षवेधी ठरले.

जागतिक नारळ दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात असा प्रथमच उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी नारळापासून वड्या, बर्फी, लाडू, घावण, कोकोनट कॉफी, आयस्क्रिम, मोदक, खोबर्‍याचा खाजा, सोलकढी, नारळाचे घारगे, नारळी भात, भाकरवड्या, खमंग भानूल अशा अनेक पाककृती बनवल्या. हे सर्व पदार्थ रुचकर झाल्याच्या प्रतिक्रिया परीक्षक प्रा. जी. एस. कुलकर्णी, डॉ. निधी पटवर्धन, प्रीती पाटील यांनी व्यक्त केल्या.

शोभिवंत वस्तूंमध्ये ज्वेलरी बॉक्स, नेस्ट, कोकोपीट, डॉल, तबला, घुबड, लँप, थ्री डी सन, पॉट, फ्लॉवरपॉट बनवले. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने या सर्व वस्तू बनवल्याचे दिसत होते. विजेत्यांना कृषी विद्यावेत्ता डॉ. दिलीप नागवेकर, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते बक्षीसे दिली.

स्पर्धेचा निकाल

पाककृती स्पर्धा : सुकन्या ओलकर (सोलकढी/शहाळे भाजी), समीक्षा चव्हाण (नारळाची खीर), सुयोग रानटे (उपवासाचे कटलेट), उत्तेजनार्थ- योगिता आंबोले (लाडू), अलीना बोदले व दानिया मुल्ला (नारळ बर्फी). 
शोभिवंत वस्तू : दानिया मुल्ला (वॉल हँगिंग), रजनीगंधा गोताड (नारळापासून घुबड), मैथिली बेंडके (दिवा), उत्तेजनार्थ योगिता भानगले (कँडल स्टँड).

"नारळाच्या शोभिवंत वस्तू, खाद्यपदार्थांतून विद्यार्थ्यांनी कलाकौशल्य दाखवले. याचा फायदा विद्यार्थ्यांसमवेत कोकणालाही आहे. शोभिवंत वस्तू व खमंग पदार्थांना बाजारपेठ मिळू शकते."

- डॉ. प्रा. मंगल पटवर्धन, विभागप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com