दापोलीत हुडहुडी; पारा 10 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

दापोली - डिसेंबरअखेरीस थंडीचा कडाका वाढला होता. मात्र, नववर्षात पारा विक्रमी घसरला आहे. आज या थंडीच्या मोसमातील 10.1 अंश सेल्सिअस अशी नीचांकी नोंद झाली. यापूर्वी दापोलीतील किमान तापमान 11, 12 आणि 23 डिसेंबरला 11 अंश सेल्सिअस इतके खाली आले होते.

ऑक्‍टोबरच्या शेवटी दापोलीत थंडी जाणवू लागली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दापोलीचे सरासरी तापमान 15.7 सेल्सिअस राहिले. याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हवामान विषम स्वरूपाचे होते. यादरम्यान दिवसा उन्हाचे चटके, तर संध्याकाळपासून पहाटेपर्यंत जोरदार थंडी जाणवत होती. 11 डिसेंबरला पहिल्यांदा सर्वांत कमी 11.2 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र, त्यानंतर पारा सरासरी 14 सेल्सिअस असा होता. डिसेंबरमध्ये सुरवातीला दापोलीत थंडी जवळपास गायब झाली होती; मात्र दुसऱ्या आठवड्यापासून पारा घसरण्यास सुरवात झाल्याने आंबा बागायतदार तसेच पर्यटक सुखावले.

Web Title: cold in dapoli