अनुस्कुरा घाटात कोसळली दरड...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

करंजफेण (सिंधुदुर्ग): कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र यांना राजापूर तालुक्‍यातून जोडणारा लगताचा मार्ग ठरलेला अनुसकुरा घाट आजही असुरक्षित आहे. जोरदार मुसळधार पावसामुळे आज (गुरुवार) सकाळी दरड कोसल्याने या मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत पुर्णपणे ठप्प झाली.

अनुस्कूरा घाटाची नैसर्गिक रचना विचित्रमय असून अनेक ठिकाणी उभा उंच कडा असून येथील माती भुसभुसित आहे. त्यामुळे वरच्यावर दरडी कोसण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी घाटातून प्रवास करताना जीव मुठीत ठेऊन करावा लागतो. शिवाय हा घाट जास्त रुंद नसल्याने वाहने जपून चालवावी लागतात. मागील अनेक वर्षात कोट्यवधी रूपयांचा निधि खर्च करून देखील घाट सुरक्षित नसणे ही चिंताजनक बाब बनली आहे. कधी दरड पडेल याचा नेम नाही.

Web Title: collapsed rift in anuskura ghat at sindhudurg