esakal | रत्नागिरीत चाकरमान्यांच्या प्रवेशासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची सूचना...
sakal

बोलून बातमी शोधा

collector mishra instruct  konkan people direct entry in ratnagiri district

दापोली, मंडणगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र रुट असणार आहे.

रत्नागिरीत चाकरमान्यांच्या प्रवेशासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची सूचना...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांना जिल्ह्यात थेट प्रवेश मिळणार आहे. सुमारे एक ते दीड लाख चाकरमानी जिल्ह्यात येण्याची शक्‍यता आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी योग्य सुविधा आणि क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्‍यात एसटीचे स्क्रिनिंग करूनच प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.  
 

मिश्रा म्हणाले, पालकमंत्र्यांच्या सूचनेने १० दिवसांचाच क्वारंटाईन कालावधी राहणार आहे; मात्र गणेशाच्या आरती, भजनाला चाकरमान्यांना उपस्थित राहता येणार नाही. चाकरमान्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. सर्व नियम व अटी पाळून त्यांना गावागावांत प्रवेश दिला जाईल. जिल्ह्यात ई-पास शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. कशेडी घाटात होणारी गर्दी टाळण्यासाठी एसटी गाड्या थांबविल्या जाणार नाहीत.

हेही वाचा - त्रिसदस्यीय समितीकडून क्लीन चीट मिळताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठले प्रांत झाले कामावर रुजू...

दापोली, मंडणगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र रुट असणार आहे. प्रत्येक तालुक्‍यात स्क्रिनिंग सेंटर असून, एसटी गाड्यांची स्क्रिनिंग करूनच गावात प्रवेश दिला जाईल. तालुका स्तरावरील क्वारंटाईन सेंटरची क्षमताही वाढविणार आहे. ॲन्टीजेन टेस्टची १५ हजार कीट उपलब्ध ठेवली आहेत. संस्थात्मक क्वारंटाईनची क्षमताही वाढविली जाणार आहे. महिला रुग्णालय लवकरच सुरू केले जाईल.

चाकरमान्यांना योग्य आरोग्य सेवा देण्यासाठी आयएमएस प्रमुखांशी चर्चा झाली आहे. ८० डॉक्‍टरांची ऑर्डर झाली आहे. आयुर्वेदिक डॉक्‍टर, खासगी डॉक्‍टर आदींची ड्यूटी लावणार आहे. ग्रामीण यंत्रणेकडून ५ डॉक्‍टर्स, १० नर्स घेतले आहेत. अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून स्वच्छता करणार तसेच ५६ सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक होणार आहे. तसेच रुग्णांवर उपचारासाठी खासगी हॉस्पिटलना परवानगी दिली आहे.

हेही वाचा -  चेकपोस्टवर स्वॅब घेतलेले चौघे आढळले बाधित़.....कुठल्या जिल्ह्यात घडले ते वाचा.....

तीन पाळ्यांमध्ये चालणार काम
जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत २०० ते २५० स्वॅब टेस्ट रिपोर्टची क्षमता आहे. मनुष्यबळ कमी असल्याने रिपोर्ट मिळण्यास दिरंगाई होत होती. हे काम आता तीन पाळ्यांमध्ये चालणार आहे. तसेच येत्या आठवड्यात दुसरी मशीन दाखल होईल, असेही त्यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top