शाळांच्या विकासासाठी एकत्र यावे : दीपक केसरकर

दीपक केसरकर : सावंतवाडी शाळा क्रमांक ४ ला आयएसओ
दीपक केसरकर
दीपक केसरकरsakal

सावंतवाडी : स्थानिक आमदार या नात्याने येथील शहर आदर्श बनविताना इथल्या शाळा ही आदर्श झाल्या पाहिजेत, असे माझे मत असून जिल्हा परिषद क्रमांक ४ शाळा हे त्यापैकी पहीले पाऊल आहे. यापुढे राजकारण बाजुला ठेऊन अशा कामामध्ये सर्वानी एकत्र या, असे आवाहन आमदार दिपक केसरकर यांनी केले.

इमारत दर्जेदार असून उपयोग नाही तर इमारतीमधील शिक्षण महत्वाचे आहे आणि हे दर्जेदार शिक्षण या शाळेने जपले आहे. त्यामुळे या शाळेच्या हॉलसाठी आणि सोलर युनिटसाठी आमदार निधी उपलब्ध करुन देईन, असा शब्दही आमदार केसरकर यांनी दिला.

शहरातील खासकिलवाडा जिल्हा परिषद शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याने त्याचा प्रदान सोहळा आज आमदार केसरकरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेविका समृध्दी विर्नोडकर, उमाकांत वारंग, जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष संतोष तळवणेकर, म. ल. देसाई आदी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, ‘‘मी पालकमंत्री असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला; मात्र सावंतवाडी शहरात जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी दिलेल्या निधीचा योग्य उपयोग या ठिकाणी झाला. आमदार या नात्याने सावंतवाडी पालिकेचा किंबहुना या शहराचा विकास करत असताना अनेक कामे माझ्या माध्यमातून झाली. त्यातील ही एक शाळा आहे. केवळ शाळा उभी राहून चालत नाही तर ती भविष्यात डेव्हलप करणे गरजेचे आहे आणि हे काम येथील पालक संघ तसेच शिक्षक वर्गाकडून करण्यात आले.’’

श्री. परब म्हणाले, ‘‘ज्या शाळेत शिकलो त्या शाळेला आयएसओ मानाकन मिळते याचा आनंद आहे. ही इमारत बांधताना जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत व पालकमंत्री दिपक केसरकर होते. दोघांच्या प्रयत्नातून हे कार्य पूर्ण झाले. याठिकाणी पाण्याचा असलेला प्रश्न सोडविताना पालिकेच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून दिड लाख रुपयांच्या निधी उपलब्ध करुन देईन. येथील मुलांना मैदान उपलब्धतेचा विषय आहे. यासाठी शहरात जागा देता येईल का? यासाठी प्रयत्न करेन.’’

केसरकर-परबांची एकमेकांवर स्तुतिसुमने

आयएसओ प्रदान सोहळ्यात संजू परब यांनी दीपक केसरकर यांचे गुणगान गात याठिकाणी राजकीय वैर बाजुला ठेऊन माझा केलेला सन्मान माझ्या कायम लक्षात राहील, असे सांगितले. माझे शिक्षण शहरातच झाले. त्यामुळे मी बाहेरचा नाही, असे सांगितले. सावंतवाडीला वेगळी संस्कृती आहे. ती संजू परब यांनी जपली, असे सांगुन आपल्याला काम करण्याची संधी मिळते, तेव्हा तुमचे- आमचे बघू नका, असे केसरकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com