कोकणातही व्यावसायिक दृष्टीने बांबूची शेती; कृषी विद्यापीठाचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

दाभोळ - कोकणात व्यावसायिक दृष्टीने बांबूची शेती होऊ शकत नाही, या मानसिकतेला येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयाने छेद दिला असून या महाविद्यालयातर्फे बांबूच्या एक दोन नव्हे तर तब्बल 65 वाणांचा चार एकर जागेवर रुजवा केला आहे. कोकणातील बांबू व्यवसायाची रुजवात मानली जात आहे. 

दाभोळ - कोकणात व्यावसायिक दृष्टीने बांबूची शेती होऊ शकत नाही, या मानसिकतेला येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयाने छेद दिला असून या महाविद्यालयातर्फे बांबूच्या एक दोन नव्हे तर तब्बल 65 वाणांचा चार एकर जागेवर रुजवा केला आहे. कोकणातील बांबू व्यवसायाची रुजवात मानली जात आहे. 

सध्या कोकणात ठराविक ठिकाणी बांबूची लागवड करण्यात येते. मात्र व्यावसायिक दृष्टीने होत नाही. वनशास्त्र महाविद्यालयाने 4 एकरात 24 जातींच्या बांबूची बेटे निर्माण केली. हा विभाग कोकणातील जमीन धारकांना बांबू लावण्यासाठी प्रोत्साहन देखील देतो. याकरिता विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन देखील करण्यात येते. येथील शेतकऱ्यांना विविध जातींच्या बांबूची माहिती देण्यात येते त्यांचे विविध उपयोग समजून सांगण्यात येतात. विद्यापीठ या बांबूच्या वर्षाला दहा हजार रोपांची विक्री करते.

विद्यापीठाने केली आहे या जातींची लागवड

  • विद्यापीठाने बासरीसाठी वापरण्यात येणाऱ्या ओकलॅन्डा ट्रॅव्हल कोटिका या विशेष बांबूची देखील लागवड केलेली आहे. ही जात विद्यापीठांनी केरळमधून आणून दापोलीत रुजवली आहे.
  • मासे पकडायच्या गळाला वापरण्यासाठी ओलीव्हिरी या जातीच्या बांबूची देखील येथे लागवड करण्यात आली आहे. या जातीचे बांबू फार लवचिक असल्याने ते सहसा मोडत नाहीत.
  • आंबा काढणीसाठी झेलयाला लावण्यासाठी वापरण्यात येणारे मेलेकोना या बांबूची देखील विद्यापीठाने लागवड केलेली आहे. 

एक बेट तीस वर्षे जगते 
बांबूची काठी तोडून त्या काड्या गादी वाफ्यात लावण्यात येतात. डिसेंबरात तोडून गादीवाफे तयार करण्यात येतात. हे गादीवाफे सावलीत तयार करण्यात येतात. त्याला सहा महिने पाण्याची व्यवस्था करण्यात येते. जून ते जुलै महिन्यामध्ये सर्व काड्या वेगळ्या करून वेगळ्या पिशव्यांमध्ये भरण्यात येतात. या काड्‌या तीन बाय तीन अंतरावर शेतकऱ्यांनी लावल्यास एका काडीपासून चार वर्षांनी उत्पन्न सुरू होते. एका बेटातून शेतकऱ्याला वर्षात सहा ते बारा बांबू विक्रीसाठी उपलब्ध होतात. एका हेक्‍टरमध्ये शेतकरी अकराशे रोपे लावू शकतो,असे तयार केलेले एक बेट तीस वर्षे जगते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commercial Bamboo farming in Konkan by Agriculture University