जनतेशी संपर्क वाढवा - आदेश बांदेकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

खोपोली - खोपोलीच्या विकासासाठी शिवसेनेचा आराखडा तयार आहे. शंभर टक्के विकासकामे करून मतदारांनी टाकलेला विश्‍वास सार्थकी ठरवा आणि जनतेशी संपर्क वाढवा, असा सल्ला शिवसेनेचे सचिव, रायगड जिल्हा संपर्क नेते आदेश बांदेकर यांनी शिवसैनिकांना दिला. नुकत्याच पार पडलेल्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे 10 उमेदवार विजयी झाले. त्यानिमित्त खोपोलीत विजयी मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. 

मेळाव्यादरम्यान मनसेचे तालुकाप्रमुख शैलेश मोरे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला. मेळाव्याला उप जिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, सह संपर्कप्रमुख विजय पाटील, ज्येष्ठ नेते व नगरसेवक किसन शेलार, रायगड जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे, शहरप्रमुख सुनील पाटील, महिला जिल्हाप्रमुख रेखा ठाकरे, माजी सभापती एच. आर. पाटील, तालुका संपर्कप्रमुख आत्माराम पाटील, तालुकाप्रमुख उमेश गावंड, युवासेना तालुका अधिकारी प्रशांत खांडेकर, उपसभापती वत्सला मोरे, तालुका महिला संघटक मनीषा मालुसरे आदी उपस्थित होते. 

बांदेकर म्हणाले, "ज्या प्रभागात पीछेहाट झाली आहे, तेथून विकासकामांना सुरुवात करा. त्या सर्वांना आपलेसे करून भविष्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये भगवा फडकवा. निवडणूक काळात उत्तम नियोजनामुळे यश संपादन करता आले.' नवनिर्वाचित नगरसेवक किसन शेलार यांनी, खोपोली पालिकेत फाईली तपासून झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार असल्याचे सांगितले. 

मनसेला गळती 
खालापूर तालुक्‍यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळती लागली आहे. तालुकाप्रमुख शैलेश मोरे यांच्यासह अन्य ठिकाणच्या शाखाध्यक्षांसहित अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेशही आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाचा असल्याची चर्चा शिवसेनेच्या गटात सुरू आहे. या वेळी राष्ट्रवादीच्या पंचायत समितीच्या माजी सभापती लता पवार, कॉंग्रेसचे हेमंत मोरे यांना बांदेकरांनी शिवबंधन बांधले. 

Web Title: Communication with the public - bandekar