बिबट्याने ठार केलेल्या गुरांच्या मालकांना भरपाई 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

पाली- बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुरांच्या मालकांना वन परिक्षेत्र विभागाकडून नुकतेच नुकसानभरपाईचे धनादेश देण्यात आले. सुधागड तालुक्‍यातील माणगाव खुर्द येथील गुरांना फेब्रुवारीत बिबट्याने ठार केले होते. 

केशव विष्णू पालवे यांच्या जर्सी गाईवर 7 फेब्रुवारीला रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. नाना भिकू पालवे यांच्या बैलावर 22 फेब्रुवारीला रात्री 11.25 ते 2 वाजण्याच्या दरम्यान कोंदरच्या नदीजवळ हल्ला करून ठार मारले होते. हे हल्ले मानवी वस्तीजवळ झाले होते. याबाबत सुधागडच्या वन परिक्षेत्र कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. वनपाल घोटवडे यांनी या ठिकाणी पंचनामे केले होते. 

पाली येथील कार्यालयात बैलमालकास 15 हजार; तर गाय मालकाला 11 हजार 250 रुपयांचा धनादेश देण्यात आला. याबाबत आरएफओ (पाली) एस. एस. रुमडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची योग्य काळजी घ्यावी. तालुक्‍यात कोठेही बिबट्या अथवा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कुठलेही जनावर दगावल्यास तालुका कार्यालयात संपर्क साधावा. आम्ही पंचनामा करून योग्य ते सहकार्य करू. 

Web Title: compensation to the owners of the animals

टॅग्स