उपसरपंचाकडून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार

अच्युत पाटील
शनिवार, 23 जून 2018

बोर्डी : कोकण पदवीधर मतदारसंघातील डहाणू तालुक्याच्या रामपूर ग्रामपंचायातीचे उपसरपंचांनी विद्यार्थ्यांना विनामूल्य वह्यांचे वाटप करून आचारसहितेचा भंग केला आहे. अशी तक्रार डहाणूचे नायब तहसीलदार दिलिप गवळी यांनी घोलवड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
शुक्रवारी (ता.22) जून रामपूर ग्रामपंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना रामपूर ग्रामपंचायत चे उपसरपंच किरण कांतु मोहिते यांच्या वतीने विनामूल्य वह्या वाटप करण्यात आल्या. यावरून तहसीलदार गवळी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 अंतर्गत कलम 131 तसेच इंडियन पिनल कोर्ट कलम 188 खाली तक्रार दाखल केली असल्याचे घोलवड पोलिसांनी स्पष्ट केले.
 
Web Title: Complaint against violation of Code of Conduct