खवली ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराविरोधात तक्रार निवेदन

pali
pali

पाली - पंचायत समिती पाली सुधागड येथे बुधवारी (ता.२४) रात्री 9.15 वाजता ‘’पंचायत राज समिती’ आली. यावेळी पिआरसी प्रमुख सुधीर पारवे यांना गजानन महादू वाडेकर, रा. करंजघर यांनी खवली ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराबाबत समितीकडे तक्रार करुन निवेदन दिले.

गजानन वाडेकर व नितीन वाघमारे हे पंचायत राज समिती पदाधिकार्‍यांची दुपारी दोन वाजल्यापासून वाट पाहत ताटकळत बसले होते. अखेर रात्री नऊ वाजता वाडेकर हे समिती प्रमुख सुधीर पारवे यांना भेटले. खवली ग्रामपंचायतीत चार वर्षात बेकायदेशीर ठराव व निधीचा गैरवापर झाला असल्याचा आरोप वाडेकर यांनी केला आहे.. गजानन वाडेकर यांनी पंचायत राज समितीला दिलेल्या तक्रारी निवेदनात सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीने चार वर्षात केलेला बेकायदेशीर खर्च, बेकायदेशीर ठराव याची सखोल चौकशी करुन सरपंच ग्रामसेवक, सदस्य यांना अपात्र ठरवून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याबरोबरच पिलोसरी येथील अंगणवाडीचे बांधकामाकरीता उपलब्द निधी खर्ची न करता परत पाठविला असल्याचा आरोप वाडेकर यांनी केला आहे. काही वर्षांपुर्वी ग्रामसभेच्या इतिवृत्तावर तत्कालीन ग्रामसेवकाने सरपंचाची खोटी स्वाक्षरी करुन शासनाची दिशाभूल केली असल्याचे तक्रारी निवेदनात म्हटले आहे. सदर ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा या मागणीकरीता पाली पंचायत समिती कार्यालयासमोर तीनदा उपोषण केले. मात्र गटविकास अधिकारी यांच्यामार्फत कारवाईस दिरंगाई होत असल्याचा आरोप वाडेकर यांनी केला आहे. एैंशी टक्के अपंग असताना शासनाच्या निधीतून मागील 10 वर्षात कोणत्याही प्रकारचा (साहित्यरुपी) लाभ मिळाला नसल्याचे वाडेकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणांची सखोल चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गजानन वाडेकर यांनी केली आहे.

सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायती विरोधात गजानन वाडेकर यांनी दिलेल्या तक्रारी निवेदनाची सखोल चौकशी केली जाईल. प्राप्त अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
सुधीर पारवे, विधानपरिषद सदस्य तथा पंचायत राज समिती प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com