पावसाळ्यापूर्वी मुंबई-गोवा मार्गाची पूर्ण दुरुस्ती करा : उदय सांमत

Complete the Mumbai-Goa route uday samant kokan marathi news
Complete the Mumbai-Goa route uday samant kokan marathi news

रत्नागिरी : कोकणात मोठया प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असते.  त्यामुळे पुढे येणारे पावसाच्या चार महिने आणि सप्टेंबर मध्ये गणपती उत्सवासाठी येणारे चाकरमणी  यांचा विचार करता कशेडी ते सावंतवाडी या दरम्यानच्या महामार्गावर एकही खड्डा पडणार नाही अथवा राहणार नाही याची तरतूद मे महिन्यातच करा, अशा सूचना संबधितांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

अल्पबचत सभागृह येथे आयोजित रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्हयांतर्गत असलेल्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उदय सांमत यांनी कशेडी ते सावंतवाडी दरम्यान मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचा या दरम्यान काम करत असलेल्या कपनीनिहाय आढावा घेतला. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी, राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी, विलास चाळके, सचीन कदम तसेच चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.


सामंत म्हणाले ज्या ठिकाणी कनेक्टीव्हीटी ब्रेक होते, घाट तसेच ज्याठिकाणी स्लोप आहे त्याठिकाणचे काम लवकरात लवकर पूर्ण करा. महामार्ग दरम्यान शास्त्री, वाशिष्ठी आदि नद्यांवर येणाऱ्या पूलाच्याच्या कामाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. ब्रिजच्या कामासाठी साहित्य वाहतूकीस अडचण येत असल्यास वाहतूक परवानंगीसाठी प्रशासनाची मदत घ्या. ब्रिजचे काम पावसाळापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी संबधितांना दिल्या.


नाभिक समाजासोबत बैठक
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लॉकडाऊनच्या धरतीवर आज नाभिक समाजाच्या प्रतिनिधीसोबत अल्पबचत सभागृह येथे बैठक घेतली. यावेळी नाभिक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. नाभिकाचे व्यवसाय करणाऱ्याने 03 मे पर्यंत थांबावे आणि प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे. 03 मे नंतर केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल. महिना दिड महिना बंद असलेला आपला व्यवसाय,  त्यामुळे आपल्याला अडचणी आदिंचा तसेच समाजातील प्रत्येक घटकाचा विचार लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर केला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com