गुहागर तालुक्‍याची चिंता वाढली 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

तिघेही मुंबईहून आले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचा रुग्ण सापडल्याने तालुक्‍यात चिंतेचे वातावरण आहे.

गुहागर : .रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्‍यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (ता. 22) तीन रुग्णांची भर पडल्याने एकूण संख्या 11 वर पोचली आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शृंगारतळी व सडेजांभारी येथील दोन गर्भवती महिलांचा आणि शृंगारतळीतील एका वृद्धाचा समावेश आहे. तिघेही मुंबईहून आले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचा रुग्ण सापडल्याने तालुक्‍यात चिंतेचे वातावरण आहे. 

ठाणे जिल्ह्यातील दर्गा रोड, मुंब्रा येथून 12 तारखेला चार वर्षांचा मुलगा, त्याचे वडील, गरोदर आई, चुलता, चुलती आणि आजी, अशा सहा व्यक्ती शृंगारतळीतील रोशन मोहल्ला येथे आल्या. स्वॅब तपासणीमध्ये चार वर्षांचा मुलगा, त्याचे वडील, काका आणि आजी 19 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्याच कुटुंबातील गर्भवती महिला आणि वयोवृद्ध आजोबा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. या दोघांना वेळणेश्‍वरमधील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. 

हे पण वाचा -क्वारंटाईन व्यक्तीचीच दादागिरी  ; नागरी कृती दलाच्या सदस्यालाच केली मारहाण..

नालासोपारा मुंबई येथून 17 मे रोजी सात व्यक्तींसह एक गरोदर महिला पहिल्या बाळंतपणासाठी तालुक्‍यातील सडेजांभारी येथे माहेरी आली. तिला 18 मे रोजी मध्यरात्री दीडच्या दरम्यान पोट दुखू लागल्याने आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल गेले. तेथे स्वॅब घेण्यात आला. त्याचा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल 22 मे रोजी रात्री जिल्हा रुग्णालयात पोचला. दरम्यानच्या काळात सिझरिंगव्दारे महिलेची प्रसूती करण्यात आली. सध्या पती, सासू, सासरे यांना जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले आहे. महिलेसोबत आलेले सात कुटुंबीय आणि वाहन चालकास होम क्वारंटाईन केले आहे. त्यांचेही स्वॅब घेण्यात येतील, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Concerns of Guhagar taluka increased