अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांना सशर्त जामिन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित विशाल नीलेश मोडक (वय 22, रा. शिवाजीनगर कणकवली) व विकास ऊर्फ विकी विजय धुरी (वय 30, रा. कासार्डे) या दोघांचीही जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे.

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित विशाल नीलेश मोडक (वय 22, रा. शिवाजीनगर कणकवली) व विकास ऊर्फ विकी विजय धुरी (वय 30, रा. कासार्डे) या दोघांचीही जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे. संशयितांच्या वतीने वकील अश्‍पाक शेख यांनी काम पाहिले. 

कणकवली तालुक्‍यातील एक अल्पवयीन मुलगी 19 फेब्रुवारीला दहावी पेपर देवून घरी जात असताना संशयित आरोपी विशाल मोडक आणि विकास धुरी यांनी तिला अनैतिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने फुस लावून पळवून नेले होते.

21 फेब्रुवारीला रात्री पटकीदेवी परिसरात काळोखात विशाल याने गाडी क्रमांक (एम. एच 07 एच 1896) मध्ये आपल्या सोबत रिलेशनशिपमध्ये रहा असे सांगितले. तर पीड़ित मुलीने संशयिताला तुला पत्नी व मुलगी आहे. त्यामुळे असे संबंध ठेवणे योग्य नसल्याचे सांगितले होते; मात्र संशयिताने पीडीत अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी 22 फेब्रुवारीला संशयित विशाल आणि विकास यांच्या विरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी संशयितांना त्याच दिवशी ताब्यात घेवून त्याना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 
संशयितांनी आपल्या वकिलांमार्फत जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी होत न्यायालयाने दोघांचीही प्रत्येकी 15 हजार रुपयांचा सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conditional Bail For Both In Abuse Of Minor Girl Sindhudurg Marathi News