मिळून साऱ्या जणी उघडू स्त्री मुक्तीची दारे...

अमित गवळे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पाली : येथील गुजराथी समाज सभागृहात स्त्रीमुक्ती दिनाचे औचित्य साधून भारतीय स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्त्री सबलीकरण व सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

पाली : येथील गुजराथी समाज सभागृहात स्त्रीमुक्ती दिनाचे औचित्य साधून भारतीय स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्त्री सबलीकरण व सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारिप महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा मेघा रिकामे होत्या. प्रमुख वक्त्या लता सोनावणे यांनी महिला कशा गुलाम होत्या हे समोर आणले. उषा कांबळे यांनी मनृस्मृती व त्यातील जाचक व्यवस्था व महिलांची झालेली प्रगती यावर मार्गदर्शन केले. तसेच मनुवाद कसा आजसुद्धा अस्तित्वात आहे. महिलांनी आपली उन्नती उदयोगातून केली पाहिजे हे सांगून महिला सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर नऊ ठरावाचं महिलांनी वाचन करुन ते पारित करुन घेतले.

क्रार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना घोरपडे यांनी केले; तर बेबीताई सरकटे, पद्मा निरभवने यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन भारिप महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस स्वप्नाली कांबळे यांनी केले; तर आभार पदमा निरभवने यांनी केले.

कार्यक्रमास दीपक मोरे रा. जि. अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ, अनंता गायकवाड, रा.जि.सरचिटणीस भा.बौ.म, मंगेश वाघमारे रा.जि.उपाध्यक्ष, हरिश्चंद्र यादव रा.जि.उपाध्यक्ष, अनिल गवळे रा.जि.प्रसिद्धी प्रमुख भारिप, एम.डी.कांबळे जिल्हा प्रवक्ता भारिप, विजय  सुर्वे जिल्हा उपाध्यक्ष, अविनाश निकम जिल्हा युवा अध्यक्ष, गोपीनाथ सोनावणे रा.जि.युवा सरचिटणीस, चंद्रकांत जाधव पनवेल तालुका अध्यक्ष सुनिल गायकवाड कर्जत तालुका अध्यक्ष, आदी मान्यवर उपस्थित होते.भारिप सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड यांनी सकाळला सांगितले की महिला सक्षमीकरणासाठी आम्ही पुढे सरसावलो आहोत.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश वाघमारे रा.जि.अध्यक्ष, अमित गायकवाड सुधागड तालुका अध्यक्ष, नरेश गायकवाड सम्यक विद्यार्थी आंदोलन रायगड जिल्हा उपाध्यक्ष आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  मेहनत घेतली.

Web Title: Conference on Women Empowerment in Pali

टॅग्स