शिवसेनेवर टीका करण्याच्या उद्देशाने 'हे' दिसले, म्हणून अभिनदंन

Congratulations On Seeing Ranjeet Desai For Purpose Of Criticizing Shiv Sena
Congratulations On Seeing Ranjeet Desai For Purpose Of Criticizing Shiv Sena

कुडाळ ( सिंधुदुर्ग) - शिवसेनेवर टीका करण्याच्या उद्देशाने का होईना रणजित देसाई कुडाळवासियांना दिसले आहेत. याबद्दल त्यांचे कुडाळ वासियांच्यावतीने मी अभिनंदन करतो, असे शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे यांनी म्हटले आहे. 

श्री. बंगे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, कोरोनामुळे लॉकडाऊनकाळात गेल्या दीड महिन्यात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी लोकांना धीर देण्याबरोबरच लोकांच्या अडचणी सोडविण्याचे काम केले. या दीड महिन्याच्या काळात लोकांना मदत करणे सोडाच; परंतु कुडाळचे लोकप्रतिनिधी या नात्याने सुद्धा देसाई कुठे दिसले नाहीत. आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने श्री. देसाई लोकांना दिसत आहेत. दीड महिन्यात देसाई कुठे होते हे येथील जनतेला माहित आहे. त्यामुळे शिवसेनेवर आरोप करण्यापेक्षा आपण कुठे होतो याचे आत्मपरीक्षण श्री. देसाई यांनी करावे, असा टोला श्री. बंगे यांनी लगावला आहे. 

त्यांनी प्रसिध्दी पुढे म्हटले आहे की, मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणात गेलेल्या जमिनींच्या मोबदल्याचे पैसे मिळवून देण्यासाठी पहिल्यापासूनच खासदार राऊत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. केंद्राच्या स्थायी समितीमध्ये अनेकवेळा हायवे मोबदल्याबाबत आवाज उठविल्यामुळे महामार्ग चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्पाचा निधी देण्यात आला आहे. त्याचबरोबर खासदार राऊत, आमदार नाईक यांच्या प्रयत्नांमुळे घावनळे तिठा, काळप नाका, हॉटेल लेमनग्रास, राज हॉटेल याठिकाणी अंडरपास मंजूर करण्यात आले. हायवेच्या कामाबाबत वेळोवेळी बैठका घेऊन पाहणी करून प्रलंबित कामे पूर्णत्वास नेली आहेत. त्यामुळे हायवेच्या कामाचे श्रेय घेऊन फुकाचे आरोप देसाई यांनी करू नयेत. 

संकट काळात नेहमीच शिवसेना जनतेसोबत असते. आज या कोरोना रोगाच्या कालावधीतही शिवसेनेने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप नेत्यांच्या आरोपाला शिवसेना जुमानत नाही. कितीही आरोप, टीका झाली तरी शिवसेना पक्ष समाजकार्यात कमी पडणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही जिल्हा प्रशासनाच्या साथीने करणार आहोत, असेही बंगे यांनी म्हटले आहे. 

भंगसाळ नदी बंधाऱ्याचे काम व येथील सुशिभिकरण कामामध्ये कोणी अडथळा आणला हे येथील जनतेला माहित आहेत. भंगसाळ नदी बंधाऱ्यातून पाणी अडवून ते चिपी विमानतळासाठी देण्यालाही श्री. देसाई यांनी विरोध केला होता. श्री. देसाई यांचे नेते निलेश राणे व नितेश राणे हे मुंबईत बसून जिल्हा प्रशासनावर व शिवसेनेवर टीका करत आहेत. हे लोक केवळ लोकांच्या भावनांशी खेळून शिवसेना विरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. श्री. देसाई देखील त्यांच्याच किस्सा गिरवत आहेत. 
- अतुल बंगे 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com