शिवसेनेच्या वाघाला काँग्रेसच्या हाताची साथ

अमित गवळे
शनिवार, 12 मे 2018

पाली (रायगड) : निवडणूकांमध्ये विविध समविचारी पक्षांच्या अाघाड्या व युत्या होतात. मात्र पाली ग्रामपंचायत निवडूकीत मात्र परस्पर विरोधी व भिन्न विचारी पक्ष एकत्र अाले आहेत. चक्क शिवसेना व काँग्रेसने एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक निवडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

पाली (रायगड) : निवडणूकांमध्ये विविध समविचारी पक्षांच्या अाघाड्या व युत्या होतात. मात्र पाली ग्रामपंचायत निवडूकीत मात्र परस्पर विरोधी व भिन्न विचारी पक्ष एकत्र अाले आहेत. चक्क शिवसेना व काँग्रेसने एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक निवडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

सुधागड तालुक्यात रविवारी (ता. 27) 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. मात्र शिवसेना सोडून सर्वच पक्षपाली ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकणार होते. परंतु सध्या सर्वच पक्षाचे उमेदवार उमेदवारी अर्ज भरत अाहेत अाणि अाघाडी व युती करुन सत्तेची गणिते गिरवितांना दिसत आहेत. परिणामी सर्व सामान्य जनता मात्र संभ्रमात अाहे.

काँग्रेस (अाय) चे सुधागड तालुकाध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी व शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी नुकताच शिवसेना कार्यालयात पाली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना व काँग्रेस सर्व जागा युती करुन लढविणार असा निर्णय घेतला. यावेळी काँग्रेसचे सुधागड तालुकाध्यक्ष कुलकर्णी म्हणाले की, पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या बैठकीत मी देखील अग्रस्थानी होतो. पण त्यावेळी असं ठरल होत की सदर निर्णयाविरोधात तत्काळ न्यालयात जायचं त्या करिता कमिटी देखील तयार करण्यात आली. 

परंतु ठरल्याप्रमाणे काही झाल नाही फक्त आम्हाला गोलमाल करण्याचंच काम चालू होत. यांनी आमची देखील फसवणूक केली. म्हणूनच आम्ही यांना धडा शिकविण्यासाठी समोर दिसणाऱ्या शिवसेने बरोबर युती करून पाली ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला अाहे. पाली ग्रा.प.निवडणुकीवर बहिष्कार टाकणारे किती दिवस आपल्या निर्णयावर ठाम राहतील ते बघूच. याच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीमध्ये विकास कामाच्या नावाने बोंबच होती आणि आजही आहे.मुलभूत सोयीसुविधा पासून जनतेला वंचित ठेवण्याचे काम या मंडळींनी केले असून यावेळी पालीतील सुज्ञ मतदार यांना यांची जागा दाखवतील, असे कुलकर्णी म्हणाले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य रविद्र देशमुख,पाली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन जवके, अविनाश शिंदे, संजय ओसवाल, संदेश सोनकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

आम्ही पाली ग्रामपंचायत निवडणुकी बाबत घेतलेला निर्णय हा प्रस्थापितांना हाटविण्यासाठी आहे. हे जे प्रस्थापित आहेत यांनी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असतांना अनेक कामाच्या, बांधकामाच्या परवानग्या देतांना पार्टी फंडाच्या नावाखाली लाखो रुपयांची लुट केली आहे. तसेच आलेली पाली नगरपंचायत ज्यांनी घालविली त्यांना खरोखरच प्रायच्छित घ्यायचे असेल तर त्यांनी पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकून इतरांना संधी द्यावी.

- प्रकाश देसाई, जिल्हाप्रमुख, शिवसेना - रायगड

Web Title: congress helps shivsena in pali raigad