अस्तित्वासाठीचा ‘संघर्ष’ सुरू

मुझफ्फर खान
बुधवार, 17 मे 2017

चिपळूण - काँग्रेस, राष्ट्रवादीने दीर्घकाळ सत्ता भोगली. विरोधात या पक्षांना चैन पडत नाही; मात्र पाठोपाठच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांची ताकद कमी होत आहे. त्यामुळे या पक्षांची सत्तारूढसाठी ते अस्तित्वासाठीचा संघर्ष अशी वाटचाल सुरू आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष यात्रेचा फंडा स्वीकारला आहे. उद्या या निमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे, विरोधी पक्ष नेत्यांचे रूप जनतेला पाहायला मिळणार आहे.

आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत, आम्हालाच त्यांचे प्रश्‍न कळतात, असा दावा करत काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते ‘आता शेतकरी संकटात आहे’, असे सांगत संघर्ष यात्रा काढत आहेत. या सर्व प्रश्‍नांवर लढणारे आता सत्तेत बसले आहेत. कर्जमाफी आणि शेतकरी आत्महत्याच्या विषयावर त्यांचा अभ्यास चालू आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचा संघर्ष आणि त्याचबरोबर अंतर्गत संघर्ष कायम आहे. मोदी लाट ओसरण्याची विरोधक वाट बघत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विरोधी नेता म्हणून एकही चेहरा जनतेला आश्‍वासक वाटत नाही. तीन वर्षांपूर्वी दोन मंत्र्यांचे ऐश्‍वर्य या जिल्ह्याला लाभले होते. सत्तेत असताना गाड्यांचा ताफा घेऊन फिरणे, उद्‌घाटने, बैठका घोषणाबाजी याची रेलचेल होती. धूळ उडवत जाणारे मंत्री आता आमदार आहेत. एक विरोधी पक्षात, तर दुसरे सत्ताधारी. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली. कार्यकर्ते बैचेन आहेत. शिवसेनेची घोडदौड व भाजपचा प्रवास थांबवेल, अशी स्ट्रॅटेजी विरोधकांकडे नाही. दोन्ही काँग्रेसमधून आऊटगोइंग सुरू आहे. कार्यकर्ते सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. कार्यकर्त्यांना नेत्यांबरोबरच संघर्ष करायला वेळ नाही. तरीही संघर्ष यात्रा सुरू आहे.

जाधवांचे कर्तृत्व दुर्लक्षित
भास्कर जाधव यांनी यापूर्वी कोकणचे प्रश्‍न विधिमंडळात मांडले. कोकणातील शेतकऱ्यांवर अनेक संकटे आली तरी ते आत्महत्या करत नाहीत. विदर्भातील आत्महत्येचे नाटक बंद करा, असे त्यांनी याच सरकारच्या सभागृहात ठणकावून सांगितल्यानंतर गोंधळ झाला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठवला म्हणून याच सरकारने त्यांचे निलंबन केले. पक्षीय पातळीवर याची दखल घेण्यात आली असती तर सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीला कोकणात संघर्ष उभा करता आला असता; मात्र राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षामुळे जाधवांचे कर्तृत्व झाकून गेले.

Web Title: congress & ncp disturbance