काँग्रेस, शिवसेना जवळीक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

पेण - पेण विधानसभा मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतींवर शेकापचे वर्चस्व असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापला रोखण्यासाठी काँग्रेस-शिवसेना युती व्हावी, अशी मागणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे. 

वडखळ व जीते या दोन जागांवर शिवसेनेचे उमेदवार इच्छुक आहेत. दादर, कासु व पाबळ या जागांवर काँग्रेस उमेदवारांनी निवडणूक लढवावी, अशा अंतर्गत प्रस्तावाची तयारी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

दुसरीकडे पेण नगरपालिका निवडणुकीत झालेली शेकाप, राष्ट्रवादी व भाजप ही आघाडी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांतही कायम राहावी, यासाठी चाचपणी सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक रंगतदार ठरणार, अशी चिन्हे आहेत.

नगरपालिका निवडणुकांचा धुरळा खाली बसत नाही, तोच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. फेब्रुवारीत अपेक्षित असलेल्या या  निवडणुकांसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 

पेणमध्ये शेकाप-राष्ट्रवादी आघाडीविरोधात स्थानिक पातळीवर काँग्रेस-शिवसेना युती होणार का, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. भाजपची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत शेकाप-शिवसेना अशी आघाडी होती. काँग्रेस व राष्ट्रवादी स्वबळावर लढले होते. या वेळी शेकापची राष्ट्रवादीसोबत आघाडी आहे. शिवसेना, भाजप व काँग्रेसने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.

पेणचे शिलेदार
पेण तालुक्‍यातील ग्रामीण भागावर शेकापचे कायम वर्चस्व. पेण पंचायत समितीमध्ये शेकाप अनेक वर्षे स्वबळावर सत्तेत आहे.
जिल्हा परिषदेच्या पाच जागांपैकी रावे काँग्रेसकडे; तर जीते व पाबळ शेकापच्या ताब्यात.
कासु व वडखळमधून शिवसेनेच्या तिकिटावर संजय जांभळे व ज्योती जांभळे हे दाम्पत्य मागील निवडणुकीत जिंकून आले. ते आता भाजपमध्ये गेल्याने या जागांवर शिवसेनेला पुन्हा श्रीगणेशा करावा लागणार आहे.

Web Title: congress shive sena politics