कणकवलीत संविधान बचाव समितीचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

कणकवली - भारतीय संविधान जाळणाऱ्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबादची घोषणा करणाऱ्यांना तात्काळ शासन झाले पाहिजे, या मागणीसाठी आणि घटनेच्या निषेधासाठी आज माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली आज येथे संविधान बचाव समितीच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

कणकवली - भारतीय संविधान जाळणाऱ्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबादची घोषणा करणाऱ्यांना तात्काळ शासन झाले पाहिजे, या मागणीसाठी आणि घटनेच्या निषेधासाठी आज माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली आज येथे संविधान बचाव समितीच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांना निवेदन देण्यात आले. 

दिल्ली येथील काही समाज कंटकांनी 9 ऑगस्टला जंतरमंतर या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रत जाळली होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. हा व्हीडीओ गेले काही दिवस सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज येथे विविध समाजाच्या संघटना एकत्रीत येत निषेध मोर्चा काढण्यात आला. येथील बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नागरीक गोळा झाले.

डॉ. मुणगेकर यांच्यासह बौद्ध सेवा समितीचे अध्यक्ष संदीप कदम, चर्मकार समाज तालुकाध्यक्ष सुजीत जाधव, संदीप तांबे, बाबुराव सावडावकर, जिल्हा बौद्ध सेवा संघाचे महासचिव प्रदीप सर्पे, सिद्धार्थ तांबे, आनंद तांबे, डॉ. व्ही.जी. कदम, सचिन तांबे, अशोक कांबळे, माजी नगरसेवक गौतम खुडकर, पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, सिद्धार्थ तांबे, सुभाष वरवडेकर, सचिन कासले, संघवी तांबे, दिलीप धामापूरकर, निलेश कदम, सुनिल जाधव आदींनी महामार्गावर निषेध मोर्चा काढला तसेच येथील पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांना निवेदन देण्यात आले. 

Web Title: Constitutional Rescue Committee Front in Kankavali