...अन् ‘माऊली’च्या मायेला फुटला पाझर!

बांधकाम अभियंत्यांची संवेदनशिलता; सावंतवाडीतील शाळेची निवेदनानंतर दुरुस्ती
Construction Executive Engineer Anamika Chavan action repair school in Sawantwadi After statement
Construction Executive Engineer Anamika Chavan action repair school in Sawantwadi After statementsakal

सावंतवाडी : पद कोणतेही असो त्या पदावर बसल्यानंतर समोरच्या व्यक्तीला किती न्याय मिळतो यावर त्या पदाची शान ठरत असते. याचाच प्रत्यय सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांच्या कामातून आला. येथील शाळा क्रमांक पाचच्या छपराची दुरुस्ती करून मुलांना सुरक्षित शिक्षणाबरोबर एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. येथील शाळा क्रमांक ५ या मराठी शाळेची झालेली पडझड बघून अनेकांचे मन हेलावून जात होते. त्याला कारण होते, शाळेत शिक्षण घेत असलेली लहान मुले छप्पर डोक्यावर आले असतानाही जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे घेत होती; पण कोणालाच पाझर फुटत नव्हता; मात्र मुख्याध्यापिका शुभलता सुकी यांच्या एका निवेदनातून कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ शाळेचे छप्पर दुरुस्त करत डागडुजीही केली.

त्यामुळे विद्यार्थी व पालक शिक्षकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ही शाळा पोलिस लाईन जवळ आहे. शहरातील सर्व शाळा या जिल्हा परिषदच्या अखत्यारित येतात; पण ही शाळा त्याला अपवाद असून एकमेव शाळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येते. त्यामुळे या शाळेकडे दुर्लक्ष होत होते. शाळेचे छप्पर दुरुस्त नाही, शाळेजवळील धोकादायक झाडे आदी समस्यांमुळे पालक मुलांना या शाळेत पाठवताना अनेक वेळा विचार करत होते. या शाळेत विद्यार्थ्यांबरोबर ज्ञानदान करणारे शिक्षकही जीव मुठीत घेऊन आपले रोजचे काम करत होते. न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न सर्वानाच पडत असल्याचे दिसत होते. अनेकांना ही शाळा सार्वजनिक बांधकामकडे येते हे ही माहिती नव्हते; मात्र सध्याच्या मुख्याध्यापिका सुकी यांनी हे शोधून काढत बांधकाम विभागासोबत पत्रव्यवहार सुरू केला.

वर्षभरात त्यांनी अनेकदा पत्र पाठवली; पण कोणीही दखल घेतली नाही. अखेर त्यांना न्याय मिळाला तो एका महिलेकडूनच. कार्यकारी अभियंता चव्हाण या अलीकडेच सावंतवाडीत नियुक्त झाल्या आहेत. त्यातच त्या स्थानिक असल्याने त्यांनी शाळा दुरुस्त करून मुलांच्या सेवेतही दिल्याने कौतुक होत आहे.

चव्हाण यांचे मानले आभार

शिक्षकांनी ही शाळा दुरुस्ती झाल्याने सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंता चव्हाण यांचे आभार मानले. काम झाल्यानंतर क्वचितच आभार मानले जातात; पण शाळेच्या मुख्याध्यापिका सुकी यांनी बांधकामच्या कार्यालयात जाऊन आभार मानत अशक्यप्राय काम करून दिल्याची आठवण करून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com